पोलीस भरती Pudhari File Photo
ठाणे

Police Recruitment | पोलीस आयुक्तालयात 1082 पदभरतीस मंजुरी

पुढारी वृत्तसेवा

मिरा रोड : मिरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील पहिल्या टप्प्यात 945 पोलीस पदांची भरती केल्यानंतर आता दुसर्‍या टप्प्यात 1082 पदे भरण्यास व त्यासाठी येणार्‍या खर्चास राज्याच्या गृहविभागाकडून मंजुरी देण्यात आली आहे.

1082 पदे भरण्यास मंजुरी मिळाल्यामुळे पोलीस आयुक्ता लयातील मनुष्यबळ वाढले जाणार असून मिरा-भाईंदर आणि वसई-विरार या दोन्ही शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यास मोठी मदत होणार आहे.

ठाणे ग्रामीण व पालघर जिल्हा पोलिसांचे विभाजन करून 1 ऑक्टोबर 2020 रोजी मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाची स्थापना करण्यात आली. सद्या पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात 18 पोलीस ठाणे आहेत. सद्यस्थितीत पोलीस आयुक्तालयात 1735 पोलीस कर्मचारी व 358 पोलीस अधिकारी कार्यरत आहेत.

नवीन पद भरती करण्यास शासनाची मंजुरी मिळाली आहे. यामुळे पोलीस आयुक्तालयाला अतिरिक्त मनुष्यबळ मिळणार आहे. यामुळे जास्त नागरिकांपर्यंत पोहोचण्यास व यांच्या तक्रारीचे कमी कालावधीत निवारण करण्यास पोलिसांना मदत होणार आहे.
मधुकर पांडेय पोलीस आयुक्त, मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय, ठाणे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT