PM Narendra Modi  File Photo
ठाणे

PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदींचे 5 ऑक्टोबरला ठाण्यात आगमन

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : ठाणे शहरात कासार वडवली येथील वालावलकर मैदान येथे होणार्‍या मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवार, दि. 5 ऑक्टोबर रोजी उपस्थित राहणार आहेत. यासाठी 40 हजार लोकांची उपस्थिती अपेक्षित असल्याने पंतप्रधान यांच्या या दौर्‍याचे नियोजन करण्यासाठी पूर्वतयारीची बैठक ठाणे महापालिका मुख्यालय येथे झाली.

मोदी यांचा हा नियोजित दौरा 5 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या दौर्‍यासाठी आवश्यक सर्व व्यवस्थांचे नियोजन करण्यासाठी विविध जबाबदार्‍यांची निश्चिती करण्यात आली आहे. त्यानुसार, पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी ठाणे महापालिका मुख्यालय येथे बैठक झाली. या बैठकीस, महापालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, महाराष्ट्र मेट्रो रेल महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, एमएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुदगल, अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने तसेच विविध महत्त्वाच्या विभाग/ कार्यालयांचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीस उपस्थित होते. पावसाळ्याचे दिवस लक्षात घेवून मुख्य सभामंडप, पार्किंग व्यवस्था येथील सर्व नियोजन करण्यात यावे. त्याचबरोबर वीज पुरवठा, इंटरनेट सेवा यांची पर्यायी व्यवस्थाही उपलब्ध करण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी यावेळी दिल्या. तसेच, या काळात मोठ्या प्रमाणावर वाहतूक होणार असल्याने वाहतुकीसाठी बंद होणारे रस्ते, सेवा रस्त्यांच्या वापराची स्थिती आदींबाबत नागरिकांना अवगत करण्यात यावे, असे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT