पनवेल (ठाणे) : विक्रम बाबर
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील आद्यक्रांतीवर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहाच्या पार्किंगमध्ये, नाट्यगृहात कँटिन चालवणार्या ठेकेदारानेच मोठ्या प्रमाणावर शेड उभारून किचनच थाटल्याचा पराक्रम केला आहे. या शेड बाबत पालिकेकडून कोणतीही अधिकृत परवानगी घेतली नसल्याचे पालिके कडून सांगण्यात येत आहे. या प्रकारामुळे स्थानिक पातळीवर आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कारण, नाट्यगृहाच्या हद्दीत एवढे मोठे शेड बांधकाम कसे उभे राहिले, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
शहरातील अध्यक्रांतीवर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह हे सांस्कृतिक कार्यक्रमांचे प्रमुख केंद्र मानले जाते. या नाट्य गृहात दररोज चार ते पाच नाटकाचे तसेच अन्य सांस्कृतिक प्रयोग पार पडतात, त्या सोबत या नाट्य गृहाच्या इमारतीची मध्ये, उपहार गृह देखील सुरू केले आहे,. या उपहार गृहात खाद्य पदार्थ विकण्याची परवानगी संबंधित ठेकेदार मैत्री कॅटरस यांना देण्यात आली आहे, त्या सोबत हे पदार्थ गरम करण्याची जबाबदारी त्या उपहार गृह च्या ठेकेदाराला दिली आहे, मात्र अन्न पदार्थ गरम करण्याची स्वतःच्या मालकीची जागा ठेकेदाराकडे नसल्याने , ठेकेदाराने नाट्यगृहाच्या पार्किंग परिसरात एका कोपर्यात पत्र्याचे भले मोठे शेड उभा केले आहे.
विशेष म्हणजे या शेड उभा केल्याची माहिती पालिकेच्या कोणत्याही वरिष्ठ अधिकार्याला नाही, या किचन शेड मध्ये काय चालते, याची माहिती देखील पालिकेकडे नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे, विशेष म्हणजे हा ठेकेदार गेल्या काही वर्षा पासून विविध कारणामुळे वादग्रस्त राहिला आहे, नुकतेच पावसाळ्यात स्थलांतरित करण्यात आलेल्या रहिवाशांना देण्यात आलेल्या नाश्ता मध्ये आळ्या आढळल्याचा प्रकार याच ठेकेदाराने पुरविलेल्या खाद्यपदार्थात घडला होता, त्या नंतर पालिकेने ठेकेदाराला केवळ नोटीस बजावून कारवाई केल्याचा बनाव केला मात्र ठोस कारवाई केली नाही, त्या मुळे ठेकेदार पालिकेच्या मर्जीतला असल्याचा आरोप केला जात आहे. याच ठेकेदाराने पालिकेच्या मालकीचे आलेल्या नाट्यगृहाच्या पार्किंगमध्ये किचन शेड उभा करून पुन्हा वाद उभा केला आहे.
नाट्यगृह हे सांस्कृतिक कार्यक्रमांचे केंद्र असून येथे येणार्या नागरिकांच्या वाहनांसाठी असलेली पार्किंगच्या शेडमध्ये नाट्यगृहाचे विद्रुपीकरण वाढले आहे तसेच धोका देखील निर्माण झाला आहे. ज्वलनशील पदार्थ बनवण्यासाठी तसेच ठेवण्यासाठी आवश्यक परवानगी घेणे क्रमपत्र असताना देखील हे शेड नियमबाह्य पद्धतीने उभा राहिले आहे.
नाट्य गृहाच्या आवरत अशा प्रकारचे शेड उभारले आहे, त्या बाबत अधिकृत माहिती घेऊन शेड ची चौकशी केली जाईल आणि परवानगी घेतली नसेल तर योग्य ती कारवाई देखील केली जाईलडॉ वैभव विधाते,
नाट्यगृहातील कॅन्टीन चा ठेका दिलेल्या ठेकेदाराला केवळ, कॉन्टिग मधील पदार्थ गरम करण्यासाठी किचन आवश्यक आहे, मात्र त्या पार्किंग मध्ये उभा केले असेल तर चौकशी केली जाईल तसेच किचन शेड छोटे असणे गरजेचे आहे. त्याने मोठे शेड मोठे उभा केले असेल तर माहिती घेऊन कारवाई केली जाईलराजेश डोंगरे, नाट्यगृह व्यवस्थापक