Padgha Gram Panchayat Water Shortage pudhari photo
ठाणे

Thane Water Shortage : पडघा गावात दहा दिवसापासून पाणीपुरवठा बंद

नागरिकांचे हाल; पडघातून भिवंडी, कल्याण, ठाणे येथे स्थलांतर

पुढारी वृत्तसेवा

कल्याण : राकेश म्हात्रे

पडघा ग्रामपंचायतीला शंभर वर्ष पुणे झाले हे सांगणारे तथाकथित पुढारी व ग्रामपंचायत प्रशासन 100 वर्षानंतर देखील नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा करू शकत नाही ही शोकांतिका असून नागरिक हतबल झालेले दिसत आहेत. व नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण तयार झाले आहे.

गेल्या दहा दिवसापासून मोटर बिघडण्याचे सांगून पडघा गावात पाणीपुरवठा बंद झाला आहे. जल जीवन योजनेमध्ये करोडो रुपये खर्च करून पडघ्या गावात पाण्याचा एक थेंबही आला नाही, व जो काही अशुद्ध पाणीपुरवठा जुपाडा येथून थेट येणारा पाणी देखील रोज मिळत नाही. एरवी देखील तीन ते चार दिवसांनी होणारा पाणीपुरवठा आज मितीस दहा-दहा दिवस येत नसल्याने पडघा येथून नागरिकांचे भिवंडी, कल्याण, ठाणे येथे स्थलांतर होण्याचे प्रमाण वाढले आहे.

एकीकडे आजूबाजूला गोडाऊन हब झाल्याने महाराष्ट्र व इतर राज्यातून नागरिकांचे मोठ्या प्रमाणात येथे स्थलांतर झाले असल्याने आधीच सर्व सोयी सुविधांवर बोजा वाढला आहे, परंतु पाण्यासारख्या जीवनावश्यक गोष्टीवर प्रशासन इतके कसे दुर्लक्ष करू शकते यावर नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. टोरेंट पावर लाखो रुपये बिल पडघा ग्रामपंचायतीकडे थकबाकी असल्याने तेथे देखील बऱ्याचदा वीस पुरवठा बंद केल्यामुळे पाणीपुरवठा खंडित केला जातो.

गेल्या कित्येक वर्षापासून पिण्याच्या पाण्यासाठी विकतच्या पाण्यावर नागरिक अवलंबून असून प्रत्येक घराला महिन्याला आठशे ते हजार रुपये कमीत कमी खर्च येत आहे हे किती वर्ष नागरिकांनी सहन करायचे असा प्रश्न नागरिकांना भेडसावत असून सत्ताधारी पक्षाचे जिल्हाप्रमुख व स्थानिक आमदार पडद्यामध्येच राहत असून देखील पडघेकरांना पाण्यासाठी हाल अपेष्ट सहन करावी लागत आहे असे एका नागरीकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. लवकरच होणारे ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये प्रस्थापितांना याचे उत्तर द्यावे लागणार आहे हे मात्र नक्की.

पाण्याबाबत पडघ्याची अवस्था अतिशय दयनीय असून जू पाडा येथे जॅकवेलला दोन मोटर लावण्याची व्यवस्था आहे परंतु एकाच मोटरवर काम चालू असल्याने त्यावर लोड येऊन सतत ते मोटर बिघडण्याचे प्रमाण वाढले आहे . प्रशासनाने तातडीने दोन मोटर लावावे म्हणजे पाणीपुरवठा सुरळीत होईल . जल जीवन योजनेमध्ये करोडो रुपये खर्च करून पाण्याचा एक थेंबही नागरिकांना मिळाला नाही. त्यामुळे सरकारचे करोडो रुपये वाया गेले आहेत.
अशोक शेरेकर ,माजी सभापती पंचायत समिती भिवंडी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT