ठाण्यामध्ये रेव्ह पार्टीचे आयोजन जितेंद्र आव्हाड यांचा आरोप  Pudhari file Photo
ठाणे

ठाण्यातील येऊरमध्ये रेव्ह पार्टीचे आयोजन

पुढारी वृत्तसेवा

ठाणे, पुढारी वृत्तसेवा : राज्यात गेल्या काही दिवसांपासून ड्रग्जबाबत अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत. या बाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनाधिकृत पब, बार आणि अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापना जमीनदोस्त करण्याचे निर्देश दिले आहेत. ही पार्श्वभुमी असताना ठाण्यातील येऊर येथे रेव्ह पार्टीचे आयोजन करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. सगळ्यात मोठे ड्रग्ज पेडलर हे येऊरमध्ये फिरत होते. वर्ल्डकप विजयाच्या जल्लोषाच्या नावाखाली रेव्ह पार्टी झाल्याचा खळबळजनक आरोप आव्हाड यांनी सोशल मिडिया हँन्डल 'एक्स' वर पोस्ट करत केला आहे.

मागील काही दिवसांत पुण्यासह राज्यात खुलेआमपणे ड्रग्जची विक्री करुन त्याचे सेवन केले जात असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. पुण्यात काही दिवसांपूर्वी पब्जमध्ये ड्रग्जचे सेवन करत असलेल्या तरुण-तरुणींचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर आता ठाण्यात रेव्ह पार्टीचे आयोजन करण्यात आल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी करून मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे कारवाईची मागणी केली आहे. "कोणतीही भीती नाही येऊरमधील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये रेव्ह पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आव्हाड यांनी केले आहे.

या बद्दल बोलताना ते म्हणाले सदर पार्टीमध्ये सर्व प्रकारची ड्रग्स उपलब्ध होती. सर्व टॉप पेडलर्स देखील मुक्तपणे फिरत होते. वर्ल्डकपच्या आनंदोत्सवाखाली हे सुरु थोथांड सुरु होतं. तसेच या ठिकाणी झालेली वाहतुक कोंडी ही मॅचमुळे नाही तर रेव्ह पार्टीमुळे झाली होते. या रेव्ह पार्टीमध्ये 80 टक्के लोक हे मुंबईमधील होते," असे जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT