राणी लक्ष्मीबाई उद्यानात ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधताना कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड. (छाया: बजरंग वाळूंज)
ठाणे

ठाणे : निरामय आरोग्याकरिता स्वत:साठी वेळ द्या : IAS Dr. Indurani Jakhar

Dr. Indurani Jakhar | ज्येष्ठांना आवाहन : शारीरिक व मानसिक आरोग्याकरिता स्वत:साठी वेळ द्या

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : ज्येष्ठ नागरिकांनी आपले मानसिक आणि शारिरीक आरोग्य निरामय राखण्याकरीता स्वत:साठी वेळ द्यावा, असे आवाहन कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांनी गुरूवारी (दि.10) एका जाहीर कार्यक्रमात बोलताना केले. इंडियन मेडिकल असोसिएशन आयोजित जागतिक मन:स्वास्थ दिन (World Mental Health Day) चे औचित्य साधून महापालिका आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड (IAS Dr. Indurani Jakhar -Commissioner Kalyan-Dombivli Municipal Corporation) यांनी कल्याण पश्चिमेतील राणी लक्ष्मीबाई उद्यानात ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला.

यावेळी उपस्थित ज्येष्ठांना मार्गदर्शन करताना आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड त्या म्हणाल्या, ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या समवयस्कांमध्ये रमून जीवनाचा आनंद घ्यावा. उत्तम स्वास्थासाठी योगा, व्यायाम, प्राणायाम, योग्य आहार घ्यावा, असे सांगून महापालिका आयुक्त डॉ. जाखड यांनी राणी लक्ष्मीबाई उद्यानात सकाळच्या प्रहरी मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या ज्येष्ठांशी अपुलकीने चर्चा करत संवाद साधला.

राणी लक्ष्मीबाई उद्यानात कार्यक्रमात उपस्थित ज्येष्ठ नागरिक

कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेल्या इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉ. सुरेखा ईटकर, डॉ. शुभांगी चिटणीस, डॉ. अमित धर्माधिकारी, डॉ. दिपक राठोड, डॉ. मंजुषा राठोड, डॉ. प्रकाश देशमुख यांच्यासह अन्य डॉक्टरांनी देखिल ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य विषयक समस्या ऐकून त्यावर मार्गदर्शन केले. या वेळी इंडियन मेडिकल असोसिएशनने जागतिक मन:स्वास्थ दिनी मुरबाड रोडला असलेल्या कल्याण हॉलपासून सुरू केलेल्या पदयात्रेची सांगता राणी लक्ष्मीबाई उद्यानात झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT