१ ऑगस्टपासून स्मार्ट कार्डशिवाय सवलत बंद pudhari photo
ठाणे

ST Bus Smart Card : १ ऑगस्टपासून स्मार्ट कार्डशिवाय सवलत बंद

एसटी प्रवासासाठी मोठा निर्णय! सवलतींचा लाभ घ्यायचा असेल तर स्मार्ट कार्ड आवश्यक

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : राज्य परिवहन व्यवस्थेच्या डिजिटल परिवर्तनाला वेग देत राज्य मार्ग परिवहन महामंडळाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. १ ऑगस्टपासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी एसटी प्रवासात एनसीएमसी (नॅशनल कॉमन मोबलिटी कार्ड) स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

राज्यात आतापर्यंत सुमारे ५१ लाख नागरिकांनी स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली असून त्यापैकी २५ लाख कार्डे कार्यान्वित करण्यात आली आहेत. उर्वरित लाभार्थ्यांनीही लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करून कार्ड मिळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी राज्यभरात ४ हजारांहून अधिक एनसीएमसी स्मार्ट कार्ड वितरण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.

ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना सहजपणे कार्ड उपलब्ध व्हावे यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. स्मार्ट कार्ड वितरणात गैरव्यवहार करणाऱ्या केंद्रांवर कठोर कारवाईचा इशाराही सरनाईक यांनी दिला. विहित शुल्कापेक्षा जास्त रक्कम आकारल्यास संबंधित केंद्राचा परवाना तत्काळ रद्द केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

महिला व ज्येष्ठ नागरिकांना शासकीय प्रवासी सवलतींचा लाभ अधिक पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने मिळावा, तसेच तिकीट वितरण प्रक्रिया आधुनिक आणि डिजिटल व्हावी, या उद्देशाने ही प्रणाली लागू करण्यात येत असल्याचे सरनाईक यांनी सांगितले.

१ ऑगस्टनंतर काय बदलणार?

  • महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी एनसीएमसी कार्ड अनिवार्य

  • सवलतीच्या प्रवासासाठी स्मार्ट कार्ड आवश्यक

  • राज्यभर ४ हजारांहून अधिक वितरण केंद्रे

  • जादा शुल्क आकारणाऱ्यांवर कठोर कारवाई

  • एसटीची तिकीट व सवलत व्यवस्था पूर्णपणे डिजिटल होणार.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT