डोंबिवली : डोंबिवलीचे आमदार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण आयोजित महाराष्ट्रातील सर्वात मोठा नवरात्री उत्सव साजरा होत आहे. नमो रमो नवरात्री गरबा क्वीन गीताबेन रबारी आणि सुप्रसिध्द गायक निलेश गढवी हे नवरात्रीचे नऊ दिवस रंगत आणणार आहेत. नमो रमो नवरात्रीचे आयोजन 3 ते 12 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत सावळाराम महाराज क्रीडा संकुल, घरडा सर्कल, डोंबिवली पूर्व येथे करण्यात आले आहे.
यावर्षी संपूर्ण वातानुकूलित 70 हजार स्क्वेअर फूट जागेमध्ये सर्वात मोठ्या 135 फूट बाय 500 फूट अशा भव्य एसी डोमची निर्मिती करण्यात आली आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात डोंबिवलीचा नमो रमो गरबा आता फार प्रसिद्ध झाला आहे. यंदा गरबा क्वीन या विशेषणाने संबोधली जाणारी गीताबेन रबारी पुन्हा एकदा नवरात्रीचे नऊ दिवस आपल्या नमो रमो नवरात्रीचा उत्सव रंगतदार करण्यास येणार आहे. सोबत ख्यातनाम गरबा गायक निलेश गढवी यांची साथ त्यांना लाभणार आहे. नमो रमो नवरात्रीची संकल्पना रुजवणारे आणि सर्व संस्थांच्या पाठीशी नेहमीच खंबीरपणे उभे राहणारे डोंबिवलीचे आमदार आणि महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्यामुळेच हा नवरात्री उत्सव भक्तिभावाने साजरा केला जातो. केवळ कल्याण डोंबिवलीच नाही तर मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल रायगड, पालघर तसेच संपूर्ण महाराष्ट्रातून गरबा खेळण्यासाठी पारंपारिक वेशभूषेत गरबा प्रेमी अवघी तरुणाई या नमो रमो नवरात्रीत उत्साहात सहभागी होतात.