ठाणे

Navi Mumbai Crime : नवी मुंबई पोलिसांकडून १८ कोटी ६३ लाख रुपयांचे अमली पदार्थ नष्ट

पुढारी वृत्तसेवा

नवी मुंबई : 'नशा मुक्त नवी मुंबई' अभियानांतर्गत अमली पदार्थांविरोधी कारवाईत नवी मुंबई पोलिसांनी ५५ वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये जप्त केलेले १८ कोटी ६३ लाख ३४ हजार २६६ रुपयांच्या किमतीचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. तळोजा येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनी येथे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ते नष्ट करण्यात आले.

मागील तीन वर्षांत बेकायदेशीररित्या वास्तव्य करून ड्रग्ज विक्री करणाऱ्या आफ्रिकन नागरिकांविरुद्ध विशेष मोहीम राबवण्यात आली. यात १५२२ जणांना हद्दपार करण्यात आले असून १११ जणांना ब्लॅकलिस्ट करण्यात आले आहे. तसेच अमली पदार्थ विक्रीत सक्रिय सहभाग आढळलेल्या आरोपींविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) अंतर्गत कठोर कारवाई करण्यात आली आहे.

पंजाब राज्यातून नवी मुंबईत येऊन हॉटेल, लॉज व पीजीमध्ये राहून ट्रक आणि रेल्वेमार्गे अमली पदार्थांची वाहतूक करून विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला. या प्रकरणात १६ गुन्हे दाखल करून ३३ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

आरोपींकडून ४ कोटी २० लाख ७० हजार रुपयांच्या किमतीचे हेरॉईन, अफू, मेफेड्रोन आणि कोडीन बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. मुख्य सूत्रधार आरोपीला पंजाब राज्यातून अटक करण्यात आली. नुकतेच वाशी पोलिसांकडून १२ कोटी रुपयांचे हायड्रो गांजासह तिघांना अटक करण्यात आली. तर तळोज्यात गेल्या आठवड्यात एक कोटीचे अंमली पदार्थ विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT