Flight Pudhari
ठाणे

Navi Mumbai to Jeddah Flight: नवी मुंबई ते जेद्दा थेट विमानसेवा १५ डिसेंबरपासून; अकासा एअरची दररोज दोन उड्डाणे

दररोज दोन विमानसेवा; सौदी अरेबियासाठी आणखी एक पर्याय

पुढारी वृत्तसेवा

मुंब्रा: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सौदी अरेबियातील जेद्दा शहरासाठी अकासा एअरची थेट विमानसेवा १५ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. या मार्गावर दररोज दोन उड्डाणे चालविण्यात येणार असून, त्यामुळे मुंबई महानगर प्रदेशासह महाराष्ट्रातील प्रवाशांना सौदी अरेबियासाठी आणखी एक आंतरराष्ट्रीय पर्याय उपलब्ध होणार आहे.

सेवेसाठी १९७ आसनक्षमतेच्या बोइंग ७३७ मॅक्स-८ विमानांचा वापर केला जाणार आहे. पहिल्या विमानाचे नवी मुंबई विमान तळावरून पहाटे ४.४५ वाजता जेद्दासाठी उड्डाण होईल.

दुसरे सायंकाळी ५.२५ वाजता रवाना होईल. जेद्दाहून येणारी विमाने अनुक्रमे सकाळी ७.३५ आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ५.२५ वाजता नवी मुंबईत दाखल होतील. मक्का आणि मदिना या पवित्र शहरांचे प्रवेशद्वार असलेल्या जेद्दासाठी थेट सेवा सुरू झाल्याने उमराह आणि हज यात्रेकरूंना मोठी सुविधा मिळणार आहे.

इराकचे हवाई क्षेत्र भारतीय विमान कंपन्यांसाठी पुन्हा खुले झाल्याने एअर इंडियाची मुंबई आणि दिल्ली येथून न्यूयॉर्कला जाणारी विमानसेवा पुन्हा थेट सुरू झाली आहे. अमेरिके-इराण युद्धामुळे गेल्या काही महिन्यांपासून या विमानांना रोम येथे इंधन भरण्यासाठी थांबा घ्यावा लागत होता.

आता तो रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचे जवळपास चार तासांची बचत होत आहे. ४ नोव्हेंबरपासून ही सेवा पूर्ववत करण्यात आली.

नव्‍या मार्गाचा वापर

अमेरिका आणि इराण यांच्यात २८ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम आशियातील हवाई क्षेत्राच्या वापराबाबत निर्बंध आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे एअर इंडियाला भारतातून अमेरिकेकडे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या विमानांचे मार्ग बदलावे लागले होते. आता इराकमधील हवाई क्षेत्र उपलब्ध झाल्यानंतर एअर इंडियाने नव्या मार्गांचा वापर सुरू केला आहे.

सिंधुदुर्गसाठी बुकिंग सुरू

नवी मुंबई विमानतळावरून सिंधुदुर्गसाठीच्या विमानसेवेचे बुकिंग सुरू झाले आहे. ही सेवा १५ नोव्हेंबरपासून सुरू होत असून या नवी मुंबई ते सिंधुदुर्ग प्रवासाचे तिकीट ३,५०० ते ३,७९८ रुपये आहे. परतीच्या प्रवासासाठी हेच तिकीटदर आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT