ठाण्यात शिवसेना नगरसेविकांनी केले आंदोलन  
ठाणे

Narsapur Case : नरसापूर प्रकरणातील नराधमावर कठोर कारवाई करा; शिवसेना नगरसेव‍िकांची मुख्यमंत्र्याकडे मागणी

ठाण्यात शिवसेना नगरसेविकांचे तीव्र आंदोलन

पुढारी वृत्तसेवा

अनिशा शिंदे

ठाणे : भोर तालुक्यातील नरसापूर येथे घडलेल्या अत्यंत धक्कादायक आणि अमानवीय घटनेने संपूर्ण राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. एका चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या घटनेचा ठाण्यात आज (दि.६) जोरदार निषेध करण्यात आला. या प्रकरणातील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात येत आहे.

ठाणे महापालिका मुख्यालयासमोर येथे शिवसेनेच्या महिला आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात आले. महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शिवसेनेच्या सर्व नगरसेविका व शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी सहभागी झाल्या होत्या. संतप्त कार्यकर्त्यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत, “अशा विकृत प्रवृत्तींना समाजात स्थान नाही,” असे स्पष्ट मत मांडले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे या प्रकरणाचा जलदगतीने तपास करून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

बदलापूर येथील प्रकरणात ज्याप्रमाणे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे आरोपीवर कारवाई करण्यात आली, त्याचप्रमाणे नसरापूर प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाई करावी अशी संपूर्ण जनतेची मागणी असल्याचे महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी नमूद केले.

शिवसेना ठाणे जिल्हा महिला आघाडी तसेच महिला संघटक मिनाक्षी शिंदे यांनीही पीडित कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे, अशी ठाम भूमिका व्यक्त केलीजर आरोपीवर लवकरात लवकर कारवाई झाली नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. या घटनेमुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, महिलांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. नागरिकांनीही संताप व्यक्त करत दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT