molestation file photo
ठाणे

Nalasopara Cheating Case: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीची फसवणूक; नालासोपारा परिसरात गुन्हा दाखल

सुरुवातीला सन 2017 मध्ये आरोपी हा नालासोपारा पूर्व येथील पूजा अपार्टमेंट, हनुमान मंदिर परिसरात चारचाकी गाडी घेऊन फिर्यादीला भेटण्यासाठी आला होता.

पुढारी वृत्तसेवा

नालासोपारा: नालासोपारा परिसरातील एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार शारीरिक संबंध ठेवत फसवणूक केल्याप्रकरणी पेल्हार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सप्टेंबर 2017 ते दि. 06 मे 2026 या कालावधीत आरोपी राहुल वावळ याने फिर्यादीशी लग्न करणार असल्याचे सांगून तिच्याशी जवळीक वाढवली.

सुरुवातीला सन 2017 मध्ये आरोपी हा नालासोपारा पूर्व येथील पूजा अपार्टमेंट, हनुमान मंदिर परिसरात चारचाकी गाडी घेऊन फिर्यादीला भेटण्यासाठी आला होता. त्यानंतर आरोपीने फिर्यादीला नालासोपारा फाटा परिसरात फिरण्यासाठी नेले. यावेळी मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत आरोपीने फिर्यादीवर प्रेम व्यक्त करत तिच्याशी अश्लील चाळे केले तसेच शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

यानंतर आरोपीने राजोडी बीच येथील रूमवर तसेच नालासोपारा पूर्व येथील देव अपार्टमेंट, प्रगती नगर, विरार पश्चिम येथील लक्ष्मी अपार्टमेंट डी एव्हेन्यू ग्लोबल सिटी आणि विरार पूर्व येथील जीवदानी कृपा चाळ, कुंभारपाडा या ठिकाणी फिर्यादीसोबत पती-पत्नीप्रमाणे राहत लग्नाचे आमिष दाखवून वारंवार शारीरिक संबंध ठेवले.

दरम्यान, आरोपी दुसऱ्या मुलीसोबत बोलत असल्याबाबत फिर्यादीने विचारणा केली असता आरोपीने तिच्यासोबत मारहाण व शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपीने दुसऱ्या मुलीसोबत विवाह केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून राहुल रविंद्र वावळ याच्याविरोधात पेल्हार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT