Water Metro Project Pudhari
ठाणे

Water Metro Project: जल मेट्रो प्रकल्पातील पहिली मेट्रो मुंबईत

मुंबई महानगर प्रदेशात सध्या जल मेट्रोचं जाळं विस्तारणार

पुढारी वृत्तसेवा

ठाणे: मुंबईत जल मेट्रो प्रकल्पातील पहिली मेट्रो मुंबईत दाखल झाली आहे. कॅन्डेला पी-12 इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी पहिली बोट जलविमान कंपनीच्या ताफ्यात दाखल झाली आहे. 27 मे रोजी दाखल झालेली ही बोट जवाहरलाल नेहरू बंदरात आहे. ही कस्टम क्लिअरन्सच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणेंनी दिली आहे.

चाचणीनंतर मेट्रो सेवेतमुंबई महानगर प्रदेशात सध्या जल मेट्रोचं जाळं विस्तारणार आहे. देशात डिसेंबर महिन्यापर्यंत पहिल्या टप्प्यात जल मेट्रोची वाहतूक सुरू होईल अशी घोषणा केली होती. त्यासाठीच आता हालचाली सुरू झाल्याचे दिसून येत आहे. कस्टम क्लिअरन्स मिळताच कॅन्डेलाची चाचणी केली जाणार आहे. या चाचण्या यशस्वी झाल्यावर पुढील निर्णय घेण्यात येईल.

मुंबईतील जल मेट्रो प्रकल्पासाठी एकूण 11 कॅन्डेला पी 12 फेरी मागवल्या आहेत. या हाय-स्पीड इलेक्ट्रिक हायड्रोफॉइल फेरीमधून ताशी 40 किमी वेगाने प्रवास करता येतो. एका वेळी या बोटीत 30 प्रवासी प्रवास करू शकतात. या फेरी सर्वप्रथम दोन मार्गांवर प्रवास करतील. पहिला मार्ग गेट वे ऑफ इंडिया ते अलिबाग असा असेल. पुढील मार्ग मांडवा ते वर्सोवा-मढ असा असेल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT