Mumbai - Nashik Highway  
ठाणे

Mumbai - Nashik Highway | मुंबई नाशिक महामार्ग गेला खड्यात : रस्त्याची झाली चाळण, तरी टोल वसुली जोरात!

पुढारी वृत्तसेवा

कसारा : मुंबई नाशिक महामार्गवरील पडघा ते इंगतपुरी या टोल रोड महाकाय खड्डे पडले असून ठिकठिकाणी रस्त्याची चाळण झाली आहे. तर काही ठिकाणी रस्त्यावरील डांबर व खडीच वाहून गेली आहे तर याच महामार्गवरील कसारा घाटातील संरक्षक कथडे देखील तुटल्याने या महामार्गांवर प्रवास करणे सध्या जिकरीचे झाले आहे.

राष्ट्रीय महामार्ग असलेल्या मुंबई नाशिक आग्रा या महामार्गांवर सध्या हजारो प्रवाशांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे यामाहामार्गवर पडघा टोल नाका ते घोटी टोल नाका या दरम्यान ठीक ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले आहेत काही ठिकाणी रस्त्याना पाच फुटाचे खड्डे पडले असून त्यात पाणी साचून डबके तयार झाले आहे.

या महामार्गवरून प्रवास करताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत असून या परिसरात अनेक आपघात या खड्या मुळे होत आहेत. यामाहामार्गवरील दोन्ही वाहिन्या खड्डे मय झाल्याने वाहनचालकांना मनके कंबरदुखी चे त्रास होऊ लागले आहेत आठवडा भरात या खड्यामुळे कसारा, शहापूर, वासिंद व पडघा हद्धीत अनेक दुचाकी आपघात झाले आहेत.

दरम्यान याच परिसरात काही ठिकाणी रस्त्यावरील डांबर, खडी देखील वाहून गेल्याने राष्ट्रीय महामार्गावरील  रस्त्यांचे काम हे दर्जात्मक नसल्याचे स्पष्ट होत आहे. पडघा ते घोटी वर्षभरात रस्त्याना किमान ६ वेळा लाली पावडर लावून ठेकेदार बिल काढत आहेत व या निकृष्ठ दर्जाच्या  लाली पावडर साठी खर्च करण्यात आलेले  करोडोच्या बिलांची रक्कम टोल च्या माध्यमातून वाहनचालकाकडून वसूल केली जातं आहे. या जीवघेण्या खड्यामुळे वाहन चालक प्रवशांकडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण चा निषेध केला जात असून या खड्याच्या सम्राज्यामुळे मुंबई नाशिक महामार्गांवर वाहन चालकांचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कसारा घाटातील कठडे तुटले....

दरम्यान मुंबई नाशिक महामार्गवरील कसारा घाटात जुन्या कसारा घाटात  उभारलेले संरक्षक कठडे तुटले असून दर महिन्याला या कठड्याची दुरुस्ती केली जाते व बिल काढले जाते परंतू संरक्षक कठडे उभे करते वेळी त्यात लोखंड व सिमेंट चा वापर होत नसल्याने रामभरोसे असलेले हे संरक्षक कठडे ठिक- ठिकाणी कोसळून पडले आहेत. त्यामुळे कसारा घाटातून नागमोडी वळणावरून प्रवास करताना वाहन चालकांनी सावधगिरी बाळगावी असे आवाहन सामाजिक संघटनांकडून करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT