मोखाडा : मोखाडा तालुक्यातील घानवळ याठिकाणी दोन, तीन दिवसांपूर्वी भूगर्भातून सौम्य धक्के जाणवल्यानंतर आता तालुक्यातील करोळी गावात सुध्दा रात्रीच्या वेळी हादरे बसल्याची घटना घडली असून काही घरातील भांडी देखील पडल्याचे प्रत्यक्षदर्शी कडून सांगण्यात येत आहे. यामुळे या हादर्याचे नेमके गुपित काय असा सवाल उपस्थित होत आहे.
कारण काही वर्षांपूर्वी जव्हार शहर आणि मोखाडा शहरातही असे हादरे जाणवले होते. त्यानंतर आता मोखड्याच्या ग्रामीण भागात असे हादरे सुरू झाल्याने नागरिकांत भितीचे वातावरण आहे. भूगर्भात अनेक कारणांमुळे असे हादरे बसत असले तरी या मागील नेमके कारण काय? याचा शोध या विभागाकडून घेणे आवश्यक आहे. तसेच तो शोध घेवून लोकांमध्ये संबधित गावात जावून लोकांमधील भीती दूर करायला हवी मात्र असे होताना दिसत नसून घानवळ येथे झालेल्या हादर्यानंतर अद्याप अजून त्या भागातील तपासणी झालेली नाही यामुळे आता करोळी भागात कधी पाहणी होणार हाच खरा मुद्दा आहे.
जर असे हादरे कशामुळे बसतात हे कळायला आठवडा जाणार असेल तर उद्या काही मोठी घटना घडली तर आपतकालीन व्यवस्था काय करणार ? आणि तातडीची मदत करणारी यंत्रणा किती सक्षम आहे हा संशोधनाचा विषय बनला आहे.
याबाबत आम्ही जिल्हा भूगर्भ विभागाला कळवळे आहे. याबाबत तपासणी ते करतील.मयूर खेंगले, तहसीलदार, मोखाडा
त्या रात्री काही सौम्य काही मोठे हादरे बसले काही घरातील भांडी देखील पडली. यामुळे आम्ही ग्रामस्थ घाबरलो होतो.नारायण महाले, ग्रामस्थ, करोळी