Mumbai Local AI Tickets Case Pudhari
ठाणे

Mumbai Local AI Miuse: AI वापरून तयार केलं मुंबईच्या एसी लोकलचं बनावट तिकीट; अंबरनाथच्या उच्चशिक्षित दाम्पत्याला अटक

Kalyan GRP: एआय वापरून लोकलचा बनावट पास; कल्याणच्या लोहमार्ग पोलिसांकडून दाम्पत्यास अटक

पुढारी वृत्तसेवा

Ambarnath fake UTS local train ticket via AI tools Case

डोंबिवली : एआयचा गैरवापर करून लोकलने प्रवास करण्यासाठी लागणारा पास तयार केल्याचा धक्कादायक प्रकार अंबरनाथमध्ये उघडकीस आला आहे. अंबरनाथच्या एका उच्चशिक्षित दाम्पत्याला कल्याण लोहमार्ग पोलिसांनी अटक केली असून अशा पद्धतीने एआयचा गैरवापर करणाऱ्या प्रवाशांवर करडी नजर असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे.

26 नोव्हेंबर रोजी कल्याणहून दादरला निघालेल्या एसी लोकलमधून गुडिया शर्मा नामक महिला प्रवास करत होती. कल्याण ते डोंबिवली दरम्यान टीसी विशाल नवले यांनी या महिलेकडे तिकीट मागितले. तिकीट तपासणी करताना तिने रेल्वेच्या यूटीएस ॲपवरील स्क्रीन दाखवली. मात्र तो पास तपासताना संशय निर्माण झाल्याने नवले यांनी रेल्वेच्या हेल्पलाईनवर संपर्क साधून पडताळणी केली.

तपासात धक्कादायक प्रकार समोर

ओम शर्मा नावाच्या व्यक्तीचा हा पास जानेवारी महिन्यात जारी होऊन फेब्रुवारीमध्येच कालबाह्य झाला होता. मात्र महिलेने स्वतःचे नाव गुडिया शर्मा असल्याचे सांगताच तिकीट तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांचा संशय आणखी गडद झाला. त्यामुळे पुढील चौकशीसाठी डोंबिवली स्थानकातील आरपीएफ कार्यालयात नेण्यात आले. चौकशी दरम्यान पतीने स्वतःच्या एसी लोकल पासवर तांत्रिक माध्यमातून बदल करून पत्नी गुडियाचे नाव आणि तपशील टाकून बनावट पास तयार केल्याचे स्पष्ट झाले.

उच्चशिक्षित दाम्पत्य

या प्रकरणी ओमकार शर्मा (३०) आणि पत्नी गुडिया शर्मा (२८) असे अटक करण्यात आलेल्या अंबरनाथमधील पती-पत्नीचे नाव आहे. यातील आरोपी ओमकार शर्मा इंजिनिअर आहेत, तर गुडिया शर्मा या बँकेमध्ये सेल्स मॅनेजर पदावर कार्यरत आहेत. या दाम्पत्याच्या विरोधात भारतीय न्याय संहितेतील कलम ३१८ (४), ३३६ (२), ३३६ (३), ३४० आणि ३ (५) अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

App द्वारे बनावट तिकीट

नवऱ्याने गुडियाला WhatsApp वर एपीके (Android Package Kit) फाईल पाठवली होती. हीच फाईल नवऱ्याने मित्रमंडळी आणि नातेवाईकांनाही पाठवली होती. या सर्वांचा शोध घेतला जात असून प्रवाशांनी अशा Apps पासून सावध रहावे, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे.

AI वापरून तयार केलं मुंबईच्या एसी लोकलचं बनावट तिकीट; अंबरनाथच्या उच्चशिक्षित दाम्पत्याला अटक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT