MD Drug Case Main Mastermind Arrested By NCB
एमडी ड्रग्ज रॅकेट Pudhari File Photo
ठाणे

Thane Crime News | 2 कोटीचे एमडी ड्रग्स जप्त

पुढारी वृत्तसेवा

मिरा रोड : काशीगाव पोलीस ठाणे हद्दीत अंमली पदार्थ विक्री करणार्‍या एक परदेशी महिला व भारतीय इसमाला अमली पदार्थ विरोधी शाखेने अटक केली आहे. त्या दोन्ही आरोपींकडून 2 कोटी 2 लाख रुपयांचा 1 किलो 9.5 ग्राम वजनाचा मॅफेड्रॉन (एम.डी.) ड्रग्स जप्त केला आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून ठाणे न्यायालयात हजर केले असता त्यांना आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

मिरा रोड येथे राहणार्‍या नागरिकाच्या मदतीने परदेशी नागरिक असलेली महिला मॅफेड्रॉन (एम.डी. ) अमली पदार्थ हे काशीगाव परीसरात मोठ्या प्रमाणावर विक्री करत असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमर मराठे व त्यांच्या पथकाने सापळा रचून 21 जुलै रोजी रविवारी (दि.२१) रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास घोडबंदर आरटीओ ऑफिस जवळ असलेल्या रस्त्यावर एम.डी. ड्रग्स पुरवठा करणारा सउद सिराज सैय्यद (37 ) मिरारोड याला ताब्यात घेतले. त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे 504.1 ग्रॅम वजनाचा 1 कोटी 82 हजार रुपये किंमतीचा मॅफेड्रॉन हा अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी आला असताना मिळून आला. तसेच महिला सबरीना रामदानी नुझुंबी (34) ,नालासोपारा पूर्व मूळ रा. विलेज कारीयाको, दारेसलम सिटी, टांझानिया हिच्याकडे 505.4 ग्रॅम वजनाचा 1 कोटी 1 लाख 8 हजार रुपये किंमतीचा मॅफेड्रॉन हा अंमलीपदार्थ मिळून आला आहे.

या कारवाई मध्ये एकूण 2 कोटी 2 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी विरुध्द् गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियमाच्या विविध कलमासह, विदेशी नागरीक कायदा कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्हयाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक अमोल आंबवने हे करत आहेत. आरोपींना अटक करून ठाणे न्यायालयात हजर केले असता त्यांना 29 तारखेपर्यंत आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

आरोपी महिलेचे भारतात बेकायदेशीररित्या वास्तव्य

परदेशी महिला सबरीना रामदानी नुझुंबी (34 ) हिला भारत सरकार कडुन व्हिसा जारी करण्यात आला असून नमुद महिला ही त्या कालावधीपेक्षा जास्त कालावधीसाठी भारत देशात बेकायदेशीररित्या वास्तव्य करत असल्याचे आढळून आले आहे.

SCROLL FOR NEXT