मांडा-टिटवाळ्यातील बेकायदा बांधकामे उद्ध्वस्त करण्यात आली.  pudhari photo
ठाणे

Thane : मांडा-टिटवाळ्यातील बेकायदा बांधकामे उद्ध्वस्त

Civic action: 123 दगडी जोत्यांवर कारवाई

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांच्या निर्देशांनुसार 1/अ प्रभागाचे सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी कल्याण कसारा रेल्वेमार्गावरील महागणपतीच्या टिटवाळ्यात अवैध बांधकामांवर कारवाई केली.

मौजे मांडा-टिटवाळ्यातील सांगोडा रोडला स्मशानभूमीलगत सुरू असलेल्या 7 खोल्यांच्या वीट बांधकामासह 123 दगडी जोत्यांवर अर्थात फाऊंडेशनवर निष्कासनाची कारवाई केली. ही कारवाई पोलिस बंदोबस्तात अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने 1 जेसीबी व 5 मजूरांच्या साह्याने करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT