Thane News
माळशेज घाटात अडकलेल्या पर्यटकांना काढले बाहेर File Photo
ठाणे

माळशेज घाटात अडकलेल्या पर्यटकांना काढले बाहेर

मोनिका क्षीरसागर

मुरबाड,पुढारी वृत्तसेवा: मुरबाड-कल्याण या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या तसेच हिरव्या शालूने नटलेल्या तसेच सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरातील माळशेज घाट परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे माळशेज घाटातील धबधबे प्रवाहित झाले आहेत.

माळशेज घाटात २३ जून २०२४ रोजी पावसाळी पर्यटनासाठी आलेले १० ते १५ पर्यटक हे धबधब्यावरती अडकून पडले होते. मात्र अचानक पावसाचा जोर वाढल्याने धबधब्याच्या पाण्याचा प्रवाह देखील वाढला. हे सर्व पर्यटक धबधब्याच्या एका टोकाला अडकून पडले होते. महामार्ग पोलीस ठाणे ग्रामीण यांनी या सर्व पर्यटकांचे रेस्क्यू ऑपरेशन करत सुखरूप पणे सुटका केली.

सविस्तर माहिती अशी की २३ जून २०२४ रोजी माळशेज घाटात पेट्रोलिंग करीत असताना पावसाचा जोर अचानक वाढल्याने माळशेज घाटातील धबधबे यांचा प्रवाह खुप जोरात वाढला होता. त्यात १० ते १५ पर्यटक व १ वर्षाचा मुलगा व २ लहान मुले असे अडकले होते. त्यांना पाण्याच्या प्रवाहाच्या बाजूने एक एक करून सुखरूप स्थळी आणून पोहोचवले आणि कुठलीही जीवित तसेच वित्त हानी झालेली नाही.

अडकलेल्या लोकांना माळशेज घाट पोलीस केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल विसपुते यांच्या मार्गदर्शनाखाली पो. शिपाई गणेश भोई, प्रशांत जाधव व कैलास कोकाटे यांनी त्यांना मदत करून रविवारी संध्याकाळी पाच वाजता बाहेर काढले. या रेस्क्यू ऑपरेशनमुळे दहा ते पंधरा पर्यटकांना सुखरूप बाहेर काढण्यात माळशेज घाट ट्राफिक पोलिसांनी एस आल्याने त्यांचे सर्वत्र या कामगिरीचे कौतुक होत आहे.

SCROLL FOR NEXT