PM Narendra Modi  File Photo
ठाणे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनामुळे वाहतुकीत मोठे बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग

अंजली राऊत

ठाणे : पुढारी ऑनलाइन डेस्क - ठाणे शहरात कासार वडवली येथील वालावलकर मैदान येथे होणार्‍या मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवार, दि. 5 ऑक्टोबर रोजी उपस्थित राहणार आहेत. या कालावधीत अतिमहत्त्वाचे व्यक्ती तसेच नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाणे वाहतुक पोलिसांनी अवजड वाहनांना घोडबंदर मार्गावर वाहतुकीस बंदी लागू केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यामुळे वाहनांना पर्यायी मार्गाने वळविण्यात आले आहेत. मोदी यांना पाहण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील विविध भागातून भाजपच्या पदाधिकाऱ्यांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे घोडबंदर मार्गावर कोंडीची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पोलिसांनी अवजड वाहनांना घोडबंदर मार्गावर शनिवार, दि. 5 ऑक्टोबर रोजी 24 तास बंदी लागू केली आहे. असे असले तरी मोदी यांच्या सभेसाठी भाजपचे पदाधिकारी वाहनांनी, बसगाड्यांनी विविध भागातून घोडबंदर मार्गे मैदानात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे घोडबंदर मार्गावर वाहनांचा भार वाढून कोंडीची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान या कार्यक्रमास सुमारे ४० हजार नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विविध भागातून नागरिक घोडबंदर मार्गे कासारवडवली मैदानात पोहचतील. घोडबंदर मार्गाने उरण जेएनपीटी येथून हजारो अवजड वाहने गुजरातच्या दिशेने वाहतुक करत असतात. तसेच गुजरात, वसई येथून वाहने भिवंडी आणि नवी मुंबईच्या दिशेने वाहतुक करत असतात. हलक्या वाहनांची वाहतुक देखील या मार्गावरून मोठ्याप्रमाणात होत असते. अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी किंवा संभाव्य अपघात होऊ नये म्हणून ठाणे पोलिसांनी वाहतुक बदल लागू करण्यात आले आहेत.

पर्यायी वाहतूक अशी राहणार....

  • नाशिक येथून नवी मुंबईच्या दिशेने वाहतुक करणारी अवजड वाहने शहापूर, मुरबाड, कर्जत मार्गे नवी मुंबई, जेएनपीटी मार्गे वाहतुक करु शकतील.

  • मुंबई येथून वाहतुक करणारी जड-अवजड वाहने ऐरोली टोलनाका मार्गे कर्जत, मुरबाड, शहापूर, वाडा, मनोर टेन नाका मार्गे वाहतुक करतील. किंवा जोगेश्वरी विक्रोळी मार्गे पश्चिम द्रुतगती मार्गाने वाहतुक करु शकतील.

  • गुजरात येथून नवी मुंबईच्या दिशेने वाहतुक करणारी अवजड वाहने मनोर टेन नाका येथून विक्रमगड, पाली, वाडा, आबिटघर, आटगाव, शहापूर, मुरबाड, कर्जत मार्गे नवी मुंबई येथील जेएनपीटी बंदराच्या दिशेने वाहतुक करु शकतील.

  • नवी मुंबई येथून गुजरात किंवा नाशिकच्या दिशेने वाहतुक करणारी अवजड वाहने कर्जत, मुरबाड, शहापूर मार्गे नाशिक तसेच आटगाव, आबिटघर, वाडा, पाली, विक्रमगड, मनोर टेन नाका, गुजरात मार्गे वाहतुक करु शकतील.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT