मुंब्रा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचारी रेखा बाबुराव शिंदे  Pudhari News Network
ठाणे

Maharashtra Shri | ठाण्याच्या पोलीस दलातील रेखा शिंदेने पटकाविला महाराष्ट्र श्री

शरीर सौष्ठव स्पर्धेत ’महाराष्ट्र श्री’ हा किताब पटकविला

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : ठाण्याच्या पोलीस दलात मुंब्रा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचारी रेखा बाबुराव शिंदे यांनी पुण्यात 5 फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या शरीर सौष्ठव स्पर्धेत महाराष्ट्र श्री हा ’किताब पटकविला.

रेखा शिंदे या ठाणे शहर पोलीस दलात कार्यरत आहेत. ’महाराष्ट्र श्री’ हा महत्वाचा मानला जाणारा किताब पटकावुन ठाणे पोलीसांच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला आहे. यामुळे रेखा शिंदेंवर कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ठाणे शहर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी शिंदे त्यांचा सत्कार करून विशेष आभार मानुन पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

ठाणे पोलीस दलात कार्यरत महिला पोलीस कर्मचारी यांनी विदेशात अटकेपार विजयाचे झेंडे रोवलेले आहेत. त्यानंतर आता ठाणे पोलीस दलातील रेखा बाबू शिंदे यांना मनाचा समाजाला जाणारा महाराष्ट्र श्री पटकावून ठाणे पोलीस दलाची शान सांभाळलेली आहे. पुण्याच्या थेऊर परिसरात झालेली ही स्पर्धा मुंबई, ग्रेटर बॉम्बे बॉडी बिल्डींग असोसिएशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. ठाणे पोलीस दलाच्या महिला कर्मचारी यांच्या यशाने पोलीस दलात आनंदाचे वातावरण आहे. महाराष्ट्र श्री विजेत्या रेखा बाबुराव शिंदे यांनी या पूर्वीही अनेक मानाची पदके आणि पुरस्कार मिळवलेले आहेत. शिंदे यांनी यापूर्वीही महाराष्ट्र पोलीस गेम 2023 मध्ये पुणे येथे झालेल्या स्पर्धेत 50-55 वजनी गटामध्ये सुवर्णपदक व चॅम्पियनशिप मिळविली होती. याशिवाय 2023 मध्ये हरियाणा येथे झालेल्या अखिल भारतीय पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये देखील सुवर्णपदक व चषक मिळविले होते. त्याचबरोबर 2024 मध्ये लखनऊ येथे झालेल्या अखिल भारतीय पोलीस गेम रेसलिंग क्लस्टर या स्पर्धेत रौप्य पदक मिळवले होते. तर महाराष्ट्र पोलीस गेम-2024 नाशिक येथे झालेल्या स्पर्धेत देखील त्यांनी सुवर्णपदकावर नाव कोरले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT