Mahad Poladpur heatwave pudhari
ठाणे

Mahad Poladpur heatwave: मोकाट गुरे सावलीच्या शोधात; पारा 45 अंश

पोलादपूरसह महाडमध्ये प्रचंड उष्णता

पुढारी वृत्तसेवा

पोलादपूर: देशासह राज्यातील विविध भागात उष्णता वाढत जात असून पारा 45 अंश पर्यत गेला आहे. पोलादपूरसह महाडमध्ये प्रचंड उष्णतेच्या झळा बसत आहेत. मनुष्य वन्य जीव प्राणी या सर्वांना या उन्हाचा त्रास सहन करावा लागत आहे.

नागरिक घरात पंखा एसी चा लाभ घेत आहेत मात्र मोकाट गुरे मात्र सावलीसाठी आडोसा शोधत भटकंती करत असल्याचे विदारक चित्र पहावयास मिळत आहे. महामार्ग चौपदरीकरणाच्या वेळी हजारो झाडाची तोड करण्यात आली.

मात्र त्या प्रमाणात लागवड करण्यात आली नसल्याने झाडाची सावली सुद्धा गुरांना शोधावी लागत आहे. सद्य स्थितीत पोलादपूर मधील पारा 40 ते 43 अंशपर्यत जात असल्याने उष्णतेत वाढ झाली आहे. तीव्र उन्हाळ्यामुळे संपूर्ण परिसर अक्षरशः तापला असून वाढत्या तापमानाने सर्वसामान्य नागरिकांसह पशुपक्ष्यांचेही हाल होत आहेत.

उन्हाळ्याच्या दिवसांत अनेक ठिकाणी ओढे, विहिरी व लहान पाणवठे कोरडे पडत असल्याने जनावरांना पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई भासत आहे. त्यामुळे अनेक पशुपक्षी तहानेने व्याकूळ होत असल्याचे चित्र गावोगावी पाहायला मिळत आहे. त्यातच मोकाट गुरे प्राणी पक्षी मोकळ्या जागेत सावली शोघत आसऱ्या साठी भटकत असल्याचे विदारक चित्र पहावयास मिळत आहे.

चौपदरीकरणचे काम,रस्ता रुंदीकरण असो किंवा मोकळ्या जागेत इमारती उभी करताना मोठ्या प्रमाणावर वृक्षाची तोड करण्यात येत आली आहे. मुंबई-गोवा महामार्गवर लाखो वृक्ष तोडण्यात आल्याचे परिणाम दिसून येत आहेत. मार्गाच्या लगत भविष्यात वृक्षलागवड तातडीने न केल्यास सावली पासून वंचित राहावे लागण्याची शक्यता दिसून येत आहे. महामार्ग वरची तोडण्यात आलेल्या वृक्षच्या बदल्यात ठेकेदार यांनी वृक्ष लागवाड करणे गरजेचे आहे, मात्र अशी लागवड केली नसल्याचे महामार्गावर फेरफटका मारताना निदर्शनात आले आहे.

मोकळ्या जागेत लावण्यात येणार वनव्याची झळ वृक्ष ना बसली असल्याने या पूर्वी अनेकदा जाळून वृक्ष पडलेले होते त्यातच वनव्यामुळे सदरचा परिसर कालवड असून तापमान वाढीस हातभार लावत हवा प्रदूषित करण्यास मदत करत असल्याचे निदर्शनात आले आहे. कडक उन्हा पासून सावली मिळावी यासाठी ठिकठिकाणी हिरवे मॅट लावण्यात आले आहेत. यामुळे सावली मिळत आहे. पोलादपूर बाजारपेठसह महाड शहराची बाजारपेठ मध्ये दोन्ही बाजूला मॅट बांधण्यात आले आहेत, या अनेक ग्राहक वर्गाला सावली चा आधार मिळत आहे.

वनसंवर्धन ही काळाची गरज

जागतिक तापमानवाढ आटोक्यात आणण्यात वनांचा फार मोठा सहभाग आहे. लोकसंख्या तसेच औद्योगीकरणामुळे शहरीकरण झपाट्याने वाढत आहे. यामुळे प्रदूषणही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वातावरणात जास्त प्रमाणात निर्माण झालेला कार्बन-डाय-ऑक्साईड हा ग्लोबल वॉर्मिंगसाठी कारणीभूत आहे. पृथ्वीला या महान समस्येपासून वाचवायचे असेल तर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण व वनसंवर्धन ही काळाची गरज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT