मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. Pudhari File Photo
ठाणे

Log Kehte Hai Main Sharabi Hoon... मद्यपी चालकांविरोधात वाहतूक पोलीसांची कारवाई

311 मद्य पिऊन वाहन चालकांविरोधात वाहतूक पोलिसांचा दणका

अंजली राऊत

ठाणे : पुढारी ऑनलाइन डेस्क - 31 डिसेंबरच्या रात्री आणि नववर्ष स्वागतासाठी मद्य पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरोधात ठाणे वाहतुक पोलिसांनी कारवाई केली. यामध्ये 311 मद्य पिऊन वाहन चालकांविरोधात आणि त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या 58 प्रवाशांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. ठाणे ते बदलापूर तसेच भिवंडी शहरात ही कारवाई करण्यात आली.

मद्यपी वाहन चालकांवरील कारवाई

  • ठाणे ते दिवा – 120

  • भिवंडी – 60

  • डोंबिवली-कल्याण- 70

  • उल्हासनगर ते बदलापूर – 61

  • एकूण – 311

नववर्ष स्वागताच्या पूर्वसंध्येला मोठ्याप्रमाणात ठिकठिकाणी पार्ट्यांचे आयोजन हौशींकडून करण्यात आले होते. मंगळवारी 31 डिसेंबरच्या रात्री ठाणे जिल्ह्यातील विविध भागात ढाबे, हाॅटेल आणि फार्म हाऊसमध्ये पार्ट्यांसाठी हाैशी नागरिकांनी गर्दी केली.

नववर्षाचा जल्लोष झाल्यानंतर म्हणून केली कारवाई

नववर्षाचा जल्लोष झाल्यानंतर काही बेशिस्त वाहनचालक मद्य पिऊन वाहने चालवितात. या प्रकारामुळे संभाव्य अपघात घडतो. मद्यपी वाहन चालकांसोबत त्याच्या सोबत प्रवास करणाऱ्या प्रवाशाला देखील जीवावर बेतण्याची शक्यता असते. त्यामुळे ठाणे वाहतुक पोलिसांनी आयुक्तालय क्षेत्रात म्हणजेच ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहरात मुख्य चौकांमध्ये वाहन चालकांची तपासणी केली. या कारवाईत 311 वाहन चालक मद्य पिऊन वाहने चालवित असल्याचे आढळून आले. या वाहन चालकांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या 58 प्रवाशांवरही पोलिसांनी कारवाई केली आहे. सर्वाधिक मद्यपी वाहन चालकांविरोधात ठाणे आणि कल्याण शहरात करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT