ठाणे

live in Relationship crime : ‘लिव्ह इन’मधील 8 साथीदारांनी जोडीदारास संपवले

दिनेश चोरगे

ठाणे; नरेंद्र राठोड : गेल्या काही वर्षांत 'लिव्ह इन रिलेशनशिप'मधील विकोपाला जाणारा वाद देखील जीवघेणा ठरतोय. ठाणे शहर आयुक्तालयात मागील पाच महिन्यांत एकूण 41 खुनाचे गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यापैकी 35 गुन्ह्यांचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या एकूण खुनाच्या गुन्ह्यापैकी आठ गुन्ह्यांत 'लिव्ह इन'मधला वाद विकोपाला गेल्याने साथीदारानेच साथीदारास संपवल्याचे समोर आले आहे. त्यामुळे लिव्ह इन रिलेशनशिपमधील काही जोडप्यांचा विकोपाला जाणारा वाद जीवावर उठत असल्याचे समोर आले आहे. ( live in Relationship crime)

मीरा रोड येथे राहणार्‍या 56 वर्षीय मनोज साने याने त्याच्यासोबत तीन वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणार्‍या 32 वर्षीय प्रेयसीची निर्घृण हत्या करून तिच्या शरीराचे तुकडे करून मृतदेहाचे तुकडे प्रेशर कुकरमध्ये टाकून शिजवून त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केल्याची घटना नुकतीच समोर आली. मुंबई शहराचे उपनगर म्हणून ओळखले जाणार्‍या मीरा भाईंदर भागात ही घटना घडल्याने मुंबईसह सारा महाराष्ट्र या क्रौर्याने हादरून गेला. अशीच घटना काही महिन्यांपूर्वी भिवंडीत घडली होती. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणार्‍या 24 वर्षीय तरुणीची तिच्याच साथीदाराने गळा दाबून हत्या केल्यानंतर रुग्णवाहिकेमधून तरुणीचा मृतदेह गुपचूप गावी नेण्याचा आरोपीने प्रयत्न होता. मात्र, भिवंडी पोलिसांनी पुणे पोलिसांच्या मदतीने आरोपीला पुण्यातून ताब्यात घेत अटक केली होती. लिव्ह इनमध्ये राहात असलेल्या दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. त्यानंतर हा वाद एके दिवशी इतका विकोपाला गेला की, या वादानंतर तरुणीची हत्या तिच्याच साथीदाराने केली. अशाच प्रकारच्या वाढत्या घटनांमुळे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणार्‍या महिला-पुरुषांचा वाद जीवघेणा ठरत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. ( live in Relationship crime)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT