वागळे : केंद्र शासन पुरस्कृत उल्हास नव भारत साक्षरता कार्यक्रम सन 2022-23 ते सन 2026-27 या कालावधीत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार राज्यात असाक्षरांना साक्षर करण्यासाठी कार्यक्रमाचे अंमलबजावणी केली जात आहे.
देशातील 15 वर्ष आणि त्याहून अधिक वयोगटातील निरक्षर व्यक्तींमध्ये पायाभूत साक्षरता (वाचन, लेखन) व संख्याज्ञान विकसीत करुन असाक्षर व्यक्तींना महत्त्वपूर्ण जीवन कौशल्ये विकसीत करावयाची आहेत. त्या माध्यमातू केंद्र पुरस्कृत उल्लास-नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत शिक्षण विभागाच्या योजना विभागाकडून गेल्या वर्षभरापासून प्रत्येक जिल्ह्यातील असाक्षर व्यक्तींचे सर्वेक्षण करून त्यांचे साक्षरतेचे वर्ग घेण्यात आले.
रविवार दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी राज्यसह सर्व ठाणे जिल्ह्यात असाक्षरांची पायाभूत साक्षरता आणि मूल्यमापन चाचणी मराठी, उर्दू, हिंदी, गुजराती,कन्नड, तेलगु तमिळ, बंगाली या नऊ माध्यमातून घेण्यात आली. या चाचणीसाठी राज्यातील 4,92,532 तर ठाणे जिल्ह्यात 1968 परीक्षा केंद्रावर उल्हास अँपवर नोंदणी केलेल्या19,828 पैकी 14,096 असाक्षर परीक्षार्थींनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत उत्साहात परीक्षा दिली. या परीक्षेसाठी तब्बल 80 वर्ष वयोगटाच्या आजीने सुद्धा साक्षर होण्याचे आपले स्वप्न परीक्षा देऊन साकार केले.
जीवन कौशल्य विकसित करण्यासाठी प्रयत्न
पायाभूत चाचणी ही वाचन, लेखन, आणि संख्याज्ञान अशा तीन भागांसाठी प्रत्येकी 50 प्रमाणे 150 गुणांची ऑफलाईन घेण्यात आली. सदरची परीक्षा ठाणे जिल्हाधिकारी, ठाणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद ठाणे सर्व शिक्षणाधिकारी, डायट प्राचार्य, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी यांनी परीक्षा केंद्रांना भेटी देऊन परीक्ष सुरळीत पार पडली. या परीक्षेच्या माध्यमातून असाक्षर व्यक्तीमध्ये विविध जीवन कौशल्य विकसित होतील, असे शिक्षणाधिकारी ( योजना ) भावना राजनोर यांनी सांगितले.