Life disrupted due to rain, Kalyan Kasara railway service stopped for 3 hours
रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आज (दि.6) पहाटे आटगाव स्थानकाच्या पुढे रेल्वे ट्रकवर झाड पडल्याने कसाराकडे जाणारी वाहतूक 2 तासाहून अधिक काळ ठप्प होती. Kalyan-Kasara train services suspended since 3 hours
ठाणे

पावसामुळे जनजीवन विस्कळीत, कल्याण कसारा रेल्वे सेवा 3 तासापासून ठप्प

पुढारी वृत्तसेवा

कसारा : रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आज (दि.6) पहाटे आटगाव स्थानकाच्या पुढे रेल्वे ट्रकवर झाड पडल्याने कसाराकडे जाणारी वाहतूक 2 तासाहून अधिक काळ ठप्प होती. सकाळी 8 वाजता रेल्वे ट्रॅकवरील झाड काढण्यात आल्यानंतर कसाराकडे वाहतूक लोकल सेवा व मागे अडकलेल्या मेल एक्सप्रेस गाड्या कसाराकडे सोडण्यात आल्या. मात्र, 3 तासाने सुरु झालेली रेल्वे सेवा लगेचच 15 मिनिटांनी पुन्हा बंद झाली.

वासिंद रेल्वे स्थानकाजवळ ओव्हर हेड वायरचा पोल खचल्याने रेल्वेचा ओव्हरहेड विज पुरवठा बंद झाला व परिणामी वासिदहून कसाराकडे जाणारी व कसाराहून मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाली. यानंतक अनिश्चित काळासाठी रेल्वे सेवा बंद झाल्याची अनाउसमेंट रेल्वे कडून करण्यात येत होती. दरम्यान, यामुळे टिटवाळा ते कसारा रेल्वे स्थानका दरम्यान दोन्ही मार्गावर मेल एक्सप्रेस, लोकल गाड्या अडकून पडल्या आहेत.

SCROLL FOR NEXT