बदलापूर ः बदलापूर जवळच्या आंबेशिव, काराव पाठोपाठ आता वांगणी गावातही बिबट्याची दहशत पसरली आहे. इथल्या शिवाजीनगर जुना भेंडी पाडा परिसरात बिबट्यानं दोन श्वानांची शिकार केल्याच समोर आले आहे.
भर लोकवस्तीत बिबट्यानं श्वानांवर हल्ला केल्यामुळे इथले नागरिक धास्तावले आहेत. बिबट्यानं श्वानांवर हल्ला केल्याची बातमी समजतात वन विभागाचं पथक वांगणी गावात दाखल झालं असून नागरिकांना सतर्क राहण्याचा आवाहन वनविभागाकडून करण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून आंबेशीव आणि काराव या दोन गावात बिबट्याचं दर्शन घडल्याचं समोर आल्या होतं.
त्यानंतर आता बिबट्याने थेट वांगणीत प्रवेश केल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीची लाट पसरली आहे. गेल्या काही दिवसांत वांगणी आणि परिसरात एक मादी बिबट्या आणि दोन बछडे दिसल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. या बिबट्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिकांकडून केली जाती आहे.