'लाडकी बहीण' योजना file photo
ठाणे

Ladki Bahin Yojana | ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या सर्वाधिक लाडक्या बहिणी

लाडक्या बहिणींचा मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात चांगला प्रतिसाद

पुढारी वृत्तसेवा
ठाणे : अनुपमा गुंडे

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर कितीही सकारत्मक, नकारत्मक टीका होत असली तरी बहिणींचा मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात चांगला प्रतिसाद आहे.

ठाणे जिल्ह्यातील लाभार्थी महिला

योजना सुरू झाल्यापासून ते आजतागयत ठाणे जिल्ह्यात 7 लाख 29 हजार 417 लाडक्या बहिणींनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे. सर्वाधिक लाडक्या बहीणींची संख्या ठाणे महापालिका क्षेत्रात आहे. शहरातील सुमारे 1 लाख 86 हजार 295 लाडक्या बहिणी योजनेच्या लाभार्थी आहेत.

21 ते 60 वर्षे वयोगटातील तसेच ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2 लाख 50 हजारपर्यंतच आहे, अशा महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत. जून 2024 पासून प्रती माह 1500 रुपये महिलांना देण्यात येत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT