Water Crisis  pudhari
ठाणे

Water Crisis: एमआयडीसीपाठोपाठ केडीएमसीकडूनही पाणी कपात; 'या' दिवशी 24 तासांकरिता पाणी पुरवठा बंद

सोमवार-मंगळवार दरम्यान 24 तासांकरिता पाणी पुरवठा बंद

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली: शासनाने दिलेल्या सूचनांनुसार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळापाठोपाठ कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेनेही पाणी पुरवठ्यात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. बारावे येथिल जलशुध्दीकरण केंद्र, नेतिवली जलशुध्दीकरण केंद्र, मोहिली जलशुध्दीकरण केंद्र आणि व टिटवाळा जलशुध्दीकरण केंद्राकडून होणारा पाणी पुरवठा येत्या सोमवारी रात्री 12 वाजल्यापासून मंगळवारी रात्री 12 वाजेपर्यंत 24 तासांकरिता बंद राहणार असल्याची सूचना केडीएमसीच्या पाणी पुरवठा विभागाने पारित केली आहे.

भारतीय हवामान खात्याने घोषित केल्यानुसार यावर्षी अलनिनो व आयओडीच्या प्रभावामुळे पावसाळा लांबण्याची शक्यता आहे. 31 ऑगस्टपर्यंत पेयजलाचे नियोजन करण्याचे निर्देश 2026 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्राप्त आहेत.

त्यानुसार कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या बारावे येथिल जलशुध्दीकरण केंद्र, नेतिवली जलशुध्दीकरण केंद्र, मोहिली जलशुध्दीकरण केंद्र आणि व टिटवाळा जलशुध्दीकरण केंद्रायेथून होणारा पाणी पुरवठा येत्या सोमवारी रात्री 12 वाजल्यापासून मंगळवारी रात्री 12 वाजेपर्यंत 24 तासांकरिता बंद राहणार आहे.

त्यामुळे कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील कल्याण पूर्व आणि पश्चिम, डोंबिवली पूर्व आणि पश्चिम, तसेच शहाड, वडवली, अटाळी, आंबिवली, मांडा-टिटवाळा परिसरातील बारावे जलशुध्दीकरण केंद्र, नेतिवली जलशुध्दीकरण केंद्र, मोहिली जलशुध्दीकरण केंद्र व टिटवाळा जलशुध्दीकरण केंद्र येथून होणारा पाणी पुरवठा 24 तासांकरिता बंद राहणार असल्याची कल्याण-डोंबिवलीसह शहाड, वडवली, अटाळी, आंबिवली, मांडा-टिटवाळाकरांनी नोंद घ्यावी. तसेच बुधवारी 13 मे रोजी पाणी पुरवठा कमी दाबाने होण्याची शक्यता आहे.

एमआयडीसीकडूनही पाणी कपात

अलनिनो व आयओडीच्या प्रभावामुळे यंदा पावसाळा लांबण्याची शक्यता आहे. महामंडळाच्या जांभूळ येथील जलशुध्दीकरण केंद्रातून होणारा पाणी पुरवठा येत्या गुरूवारी दुपारी 12 वाजल्यापासून शुक्रवारी दुपारी 12 वाजेपर्यंत, तसेच 21 मे रोजी दुपारी 12 वाजल्यापासून 23 मे रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत 24 तासांकरिता बंद राहणार आहे. या संदर्भात एमआयडीसीने ही सूचना पारित केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT