ठाणे : शुभम साळुंके
डोंबिवली दौऱ्यावर येणाऱ्या उप मुख्यमंत्री एकसाथ शिंदेच मनसे कडून आभार व्यक्त करण्यात आलं आहे. पालकमंत्र्यांचे आभार व्यक्त करताना कल्याण डोंबिवलीच्या जनतेला शुभेच्छा देखील देण्यात आल्या आहेत. मनसेचे नेते प्रमोद (राजू ) पाटील यांनी एक्स पोस्ट करून शिंदेच्या दौऱ्यावर भाष्य केलं आहे. पाटील यांनी आपल्या पोस्ट मध्ये भूमिपूजन करून रखडलेल्या विकास कामांची आठवण देखील करून दिली आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अंतर्गत रविवार (दि.18) रोजी आज विविध विकास कामांचा भूमीपूजन व शुभारंभ सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला राज्याचे उप मुख्यमंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित असणार आहेत.
शिंदेवर आपल्या खास शैलीत निशाणा साधणारे मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी आजही संधी सोडली नाही. त्यांनी आपल्या एक्स पोस्ट मध्ये म्हटलं आहे कि, चला चला भूमीपुजनांची वेळ झाली, पालिकेची निवडणूक आली ! आज पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते केडीएमसीत काही भूमीपुजन होत आहेत त्याबद्दल कल्याण-डोंबिवलीकर जनतेला शुभेच्छा व पालकमंत्र्यांचे आभार ! या निमित्ताने आमचे पालकमंत्री आज कल्याण-डोंबिवलीत येत आहेत तर त्यांनी २०१८ मध्ये भूमीपुजन केलेल्या पलावा पुल, लोकग्राम पुल, दिवा रेल्वे ROB, २७ गावांसाठी असलेली अमृत योजना यांचा आढावा घेऊन त्यांची लोकार्पणाची तारीख जाहीर करावी. तसेच एकीकडे परिवहन च्या ताफ्यात २०० इलेक्ट्रिक बस केवळ चार्जिंग स्टेशन नसल्यामुळे येत नाहीत, आमची एक महिला भगिनी पालिका दवाखान्याबाहेर रूग्णवाहिका नसल्याने मृत्युमुखी पडली तसेच डोंबिवलीतील सुतिकागृहचे काम अजून का सुरू होत नाही याचा आढावा घेऊन त्यावर खुलासा करावा. बाकी कल्याण-शीळ रस्त्याचा बट्ट्याबोळ ( मग त्यात रस्ते बाधितांच्या मोबदल्या अभावी रखडलेले तिसऱ्या लाईनचे भूसंपादन असेल , मेट्रोचे बेशिस्त काम असेल किंवा या रस्त्यावरील अतिक्रमणे असतील ) हा सर्व त्यांच्याच खात्याचा प्रताप आहे. त्यावरही सकारात्मक निर्णय घेतील अशी आशा करू या. असं पाटील यांनी आपल्या एक्स पोस्ट मध्ये म्हटलं आहे. पाटील यांच्या या पोस्ट वर नागरिकांकडून देखील सकारात्मक प्रतिसाद देत सत्ताधाऱ्यांना लक्ष करायला सुरुवात केली आहे.