कल्याण : सतीश तांबे
आगामी पालिका निवडणुक घेण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगर पालिका सज्ज झाली असून निवडणुकी नंतर निवडून येणाऱ्या विविध पक्षाच्या लोकप्रतिनिधींच्या दालनाच्या दुरुस्तीचा घाट पालिकेतील बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी घालीत पालिका मुख्यालयातील लोकप्रतिनिधींची कार्यालया सह पालिका अधिकारी व महत्वाच्या विभागाच्या कार्यालयाच्या दुरुस्तीसाठी बांधकाम विभागातील अभियातासह पाहणी सुरू केली आहे. आगामी पालिका निवडणुकीची आचारसंहिता लागण्याच्या भीतीने आतापासूनच पालिका मुख्यालयातील लोकप्रतिनिधीं, अधिकारी वर्गाच्या दालनाच्या दुरुस्तीच्या कामासाठी पालिकेच्या अर्थसंकल्पातील निधी खर्च करण्यासाठी लगबग सुरू करीत लाखो रुपयाच्या कामाच्या निविदा काढण्याचा घाट रचला जात आहे.
कल्याण डोंबिवली महानगर पालिकेतील लोकप्रतिनिधी राजवट नोव्हेंबर २०२० साली संपुष्टात आली. त्यानंतर पालिकेत प्रशासकीय राजवट लागू करण्यात आली. तेव्हापासून आजमितीपर्यंत पालिकेतील विविध लोकप्रतिनिधींच्या पक्षाच्या गटनेते, विरोधी पक्ष नेते, सभागृह नेता, स्थायी समिती सभापती, महापौर, उपमहापौर यांच्या कार्यालयांना टाळे लावण्यात आल्याने गेली पाच वर्ष ही कार्यालये बंद अवस्थेत आहेत.
राज्यातील सर्वच महानगर पालिका, नगर पालिका व जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर करून निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. निवडणुकीचे बिगुल वाजल्या नंतर निवडणूक घेण्यासाठी कल्याण-डोंबिवली महानगर पालिका सज्ज झाली असून प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर येत्या काही दिवसात प्रभागातील आरक्षणाची सोडतीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. त्यानंतर प्रत्यक्षात निवडणुकीच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. आगामी पालिका निवडणुकी नंतर निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या दालनाच्या दुरुस्ती कडे पालिकेच्या बांधकाम विभागाने लक्ष केंद्रित केले आहे. आगामी पालिका निवडणुकीची आचार संहिता येत्या काही महिन्यांनी लागणार असल्याने पालिका मुख्यालयातील विविध पक्षाच्या लोकप्रतिनिधींची कार्यालये तसेच पालिका अधिकारी प्रशासनाच्या महत्वाच्या विभागाच्या कार्यालयाच्या डागडुजी तसेच दुरुस्तीसाठी बांधकामा विभागाचे अभियंता सरसावले आहेत. पालिकेच्या यंदाच्या आर्थिक संकल्पात इमारत डागडुजी, दुरुस्ती व अन्य केली जाणाऱ्या कामासाठी तरतूद केलेला निधी खर्च करू लाखो रुपयांच्या खर्चाची कामे करण्यासाठी पालिका मुख्यालयातील महत्वाच्या अधिकाऱ्याच्या केबिन तसेच पालिका मुख्यालयातील लोकप्रतिनिधी इमारत व प्रशासकीय इमारतीतील कार्यालयाची पाहणी करून दुरुस्तीची कामे केली जाणार आहे. पालिकेचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता जगदीश कोरे याच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दिली डागडुजी व दुरुस्तीची कामे मोठ्या खर्चाची असल्याने ही कामे करण्यासाठी इ टेंडरिंगद्वारे निविदा काढून कामे केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
वर्कऑर्डर काढण्यासाठी धावपळ
गेली पाच वर्षाहून अधिकच काळ बंद असलेल्या विविध लोकप्रतिनिधींची कार्यालयाच्या दुरुस्तीसाठी पाहणी करून कामे करून घेण्यासाठी यादुरुस्तीच्या कामाची लाखो रुपयांच्या निविदा काढण्यासाठी लगबग सुरू केली आहे. आचारसंहितेपूर्वी या कामाची इस्टिमेंट बनवून निविदा काढून वर्क ऑर्डर काढण्यासाठी पालिकेच्या बांधकाम विभागाचे अधिकारी धावपळ करीत असल्याचे दिसून येत आहे. लोकप्रतिनिधी राजवट नसल्याने प्रशासनाच्या मंजुरी कामे करून आपल्या हित संबंधित ठेकेदाराला ही कामे मिळवून देण्यासाठीचा घाट रचला जात आहे. नव्याने निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींची कार्यालयाची दुरुस्ती रागरंगोटी करून सुस्थिती बनवन ठेवण्याचा उद्देश असला तरी बनवून ठेवण्याचा उद्देश असला तरी पालिका निवडणुकीच्या आचारसंहितेचा बागुलबुवा करून कोट्यावधी रुपयांची दुरुस्तीची कामे मंजूर करून घेऊन करदात्या नागरिकाच्या कररुपी पैशाची या कामावर उधळण होणार आहे.