कायाकल्प पुरस्कार pudhari file photo
ठाणे

Kayakalp Award Scheme Thane : जिल्ह्यातील 11 रुग्णालयांना कायाकल्प पुरस्कार

उल्हासनगर येथील स्त्री रुग्णालयाचा राज्यातून तिसरा क्रमांक पटकावला

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : रुग्णांना चांगल्या उपचाराबरोबर रुग्णालयात स्वच्छता नीटनेटकेपणा देखील महत्वाचा ठरत असून, ठाणे जिल्हा आरोग्य प्रशासनाने हीच कास धरली आहे आणि याचे फलित जिल्ह्यातील सिव्हील हॉस्पिटल, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय आदी केंद्र आणि राज्य शासनाच्या परीक्षेत उत्तीर्ण ठरली आहेत

सरकारकडून शासकीय रुग्णालयाना कायाकल्प पुरस्कार देऊन गौरवण्यात येत असून यावर्षी जिल्ह्यातील 12 शासकीय रुग्णालयापैकी 11 रुग्णालयांना हा पुरस्कार नुकताच मिळाला आहे.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार, निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्यासंपर्क) डॉ. मृणाली राहुड यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णालयामार्फत दिल्या जाणार्‍या सोयी सुविधांची दाखल केंद्र अणि राज्य सरकारने घेतली आहे. यावेळी शासकीय रुग्णालयांना केंद्र आणि राज्य शासनाकडून दिले जाणारे कायाकल्प पुरस्कारांमध्ये ठाणे जिल्ह्याला 11 पुरस्कार मिळाले आहेत. उल्हासनगर येथील स्त्री रुग्णालयाने संपूर्ण राज्यातून तिसरा क्रमांक पटकावला आहे. तर 2023-24 च्या वर्षी सिव्हील रुग्णालय ठाणे, पंडित भीमसेन जोशी रुग्णालय मीरा भाईदर, मध्यवर्ती रुग्णालय उल्हासनगर, सामान्य रुग्णालय मालवणी मालाड, स्त्री रुग्णालय उल्हासनगर, या रुग्णालयांना 3 लाखाचे पारितोषिक मिळाले आहे. उपजिल्हा रुग्णालय भिवंडी, उपजिल्हा रुग्णालय शहापूर, उपजिल्हा रुग्णालय बदलापूर, उपजिल्हा रुग्णालय अंबरनाथ, ग्रामीण रुग्णालय गोवेली, ग्रामीण रुग्णालय मुरबाड यांना एक लाख पारितोषिक म्हणून प्राप्त झाले आहे. यात प्रतेक रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी, नर्सिंग स्टाफ, सफाई कर्मचारी यांचे मोलाचे योगदान आहे. जिल्हा गुणवत्ता आश्वासन समन्वयक डॉ.नेहा पेटकर, दक्षता मेंतोर डॉ. तेजस्विनी, प्रीतीश नर्स स्टाफ, सागर नर्स स्टाफ हे या जिल्हा गुणवत्ता टीमचे महत्वाचे घटक असल्याचे डॉ. मृणाली राहुड यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT