Accident  
ठाणे

Kasara Accident | खर्डी रेल्वे पुलावरील कठड्याला धडकून दुचाकीस्वार २०० फूट खाली रेल्वे ट्रॅकवर पडले

एकाचा जागीच मृत्‍यू : एकजण गंभीर जखमी

पुढारी वृत्तसेवा

कसारा : मुंबईहून नाशिककडे जात असताना एका दुचाकीचा अपघात होऊन झालेल्या अपघातात एक जण जागीच ठरवतात एक जण गंभीर जखमी आहे.  याबाबत सविस्तर असे की देवराम मशाळ रा , पिंपरकणे  व त्याचा मित्र गोरक्षनाथ भांगरे रा पिंपरकणे  हे आपल्या दुचाकी क्रमांक एम एच ०५ एफ एक्स ५०१९ ने टिटवाळ्याहून आपल्या गावी पिंपरकणे तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर येथे जात होते.

मुंबई नाशिक महामार्गावरील खर्डी रेल्वे पुलावर भरधाव दुचाकी नियंत्रणात न आल्याने दुचाकी पुरावरील कठड्याला धडकली. दुचाकी वरील देवराम व गोरक्षनाथ हे दोघेही 200 ते 250 फूट खोलवर असलेल्या रेल्वे ट्रॅकवर फेकले गेले व दुचाकी रोडच्या बाजूला पडली या भीषण अपघातात देवराम मशाळ या तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर गोरक्षनाथ भांगरे हा तरुण गंभीरित्या जखमी झाला.

अपघाताची माहिती मिळताच रेल्वे पोलीस, खर्डी पोलीस  व आपत्ती व्यवस्थापन टीम चे  सदस्य रुपेश भवारी  घटनास्थळी दाखल होत घटनास्थळी उपस्तित असलेल्या लोकांच्या मदतीने  मदत खर्डी ग्रामीण रुग्णालयातील रुग्णवाहिकेतून त्यां‍ना रुग्णालयात दाखल करण्यात आले यावेळी देवराम मशाळ यांस मृत घोषित केले.

गंभीर जखमी गोरक्षनाथ भांगरे यास पुढील उपचारासाठी शहापूर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान या प्रकरणी पुढील तपास आसनगाव रेल्वे पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी करीत आहे.

अन्यथा मोठा अनर्थ झाला असता.

दरम्यान अपघात वेळी कशाला आसनगाव रेल्वे स्थानकादरम्यान  दुरुस्ती ब्लॉक असल्याने लोकल सेवा बंद होत्या त्यामुळे पुढील अनर्थ टळला त्यातच अपघात दुचाकी देखील रस्त्याच्या बाजूला पडल्याने मोठी हानी टळली जर दुचाकी स्वार दुचाकीसह  कोसळले असते तर दुचाकी ओव्हरहेड वायर याला अडकून मोठा स्फोट झाला असता व त्यामुळे मोठा अनर्थ घडला असता.

गावात रोजगार नसल्याने उदरनिर्वाहसाठी  टिटवाळा येथे राहायचे तरुण 

 अतिशय दुर्गम भागात राहत असल्याने गावाकडे रोजगार उपलब्ध नसल्याने  अपघातग्रस्त तरुण आपल्या घरच्यांसह टिटवाळा येथे वास्तव्य करत होते तिथेच काम धंदा करून आपल्या व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे हे तरुण भरधाव  वेगात गावाकडे निघाले असता हा भीषण अपघात झाला या अपघातामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT