Kasarvadavali Flyover Pudhari
ठाणे

Kasarvadavali Flyover: कासारवडवली उड्डाणपूल हलत असल्याने वाहतुकीला बंद; उड्डाणपुलाचा काही भाग तुटल्याने खळबळ

हा उड्डाणपूल संपूर्ण तपासणी होईपर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त पंकज शिरसाठ यांनी दिली आहे.

पुढारी वृत्तसेवा

ठाणे: ऐन गणपती उत्सवात काही महिन्यापूर्वी सुरू झालेला घोडबंदर रोडवरील कासारवडवली उड्डाणपुलाचा काही भाग तुटला असून पूल हलत असल्याचे व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्याने पूल तातडीने वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहे. हा उड्डाणपूल संपूर्ण तपासणी होईपर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त पंकज शिरसाठ यांनी दिली आहे.

घोडबंदर रोडवरील कासारवडवली उड्डाणपूल हा घाईघाईने बांधण्यात आला असून त्याचे उद्घाटनही तसेच झालेले होते. प्रचंड वाहतूक कोंडीमुळे हैराण झालेल्या ठाणेकरांना एमएमआरडीएने बांधलेल्या या उड्डाण पुलामुळे थोडा दिलासा मिळाला होता.

मेट्रोचे काम सुरू असून सर्व्हिस रोड हा मुख्य रस्त्याला जोडण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी अधिक होत असते. ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी कासारवडवली उड्डाणपुलाचे काम हाती घेण्यात आले.

पुलाचे ठाण्याकडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारा एक भाग तयार झाला असून दुसऱ्या भागाचे काम अद्याप सुरू झाले नाही. पहिला भाग वाहतुकीस खुला करण्यात आला व त्यावर काही दिवसात खड्डे पडले.

शुक्रवारी हा उड्डाणपूल हलत असल्याचे आणि त्याचा काही भाग तुटल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यामुळे एकच खळबळ उडाली. पुलाच्या दोन्ही बाजूला जोडणारा भाग तुटल्याचे दिसत आहे.

याची गंभीर दखल घेऊन वाहतूक पोलिसांनी उड्डाणपूल आजपासून वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आल्याने वाहतूक कोंडीला सुरुवात झाली आहे. अचानक पुल का बंद करण्यात आले यावर उलट सुलट चर्चा सुरू झाली.

अहवाल येईपर्यंत उड्डाणपूल बंद

याबाबत पोलीस उपआयुक्त पंकज शिरसाठ यांना विचारणा केली असता, उड्डाणपुलाची पूर्ण पाहणी आणि तपासणी करण्यासाठी वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. या तपासणीचा अहवाल येइपर्यंत आणि संबंधित दुरुस्ती होईपर्यंत उड्डाणपूल वाहतूकसाठी बंद राहील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT