Kalyan Crime Pudhari
ठाणे

Kalyan Crime: महिलेशी गैरवर्तन, रहिवाशांना मारहाण; हायप्रोफाईल सोसायटीत दादागिरी

कल्याणमध्ये खळबळ

पुढारी वृत्तसेवा

कल्याण: कल्याण पश्चिमेतील एका हायप्रोफाईल सोसायटीत महिलेशी गैरवर्तन करून रहिवाशांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे.

या सोसायटीतील निवृत्त पोलीस अधिकारी याने धुमाकूळ घालत महिलांशी गैरवर्तन, अश्लील शिवीगाळ आणि सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण केल्या- प्रकरणी कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

बुधवारी रात्री 8:30च्या सुमारास त्या सोसायटीतील एक महिला लहान मुलाला घेऊन बाहेर जाण्यासाठी आपली दुचाकी पार्किंगमधून बाहेर काढत होत्या. यावेळी सोसायटीतच राहणारे निवृत्त पोलीस अधिकारी यांनी मुद्दाम आपली गाडी महिलेच्या गाडीमागे लावली. वारंवार हॉर्न वाजवूनदेखील त्यांनी आपली गाडी बाजूला घेतली नाही आणि तक्रारदार महिलेकडे पाहण्यास सुरुवात केली.

यानंतर तिला शिवीगाळ केली. या वादाचे रूपांतर पुढे मोठ्या हाणामारीत झाले. यावेळी सोसायटीचे लोक जमा झाले असता, आरोपीने सर्वांना अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

यावेळी सोसायटीतील महिला व इतर सदस्याने त्यांना विरोध केला असता त्यांना देखील शिवीगाळ केली त्याचबरोबर त्यांना विरोध करणाऱ्या पुरुषांना देखील मारहाण केली.

तक्रारदार महिलेचा विनयभंग करून तिचे चारित्र्यहनन करणारे शब्द वापरले असल्याचे आरोप या महिलेने करत या प्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT