Kalyan Skywalk Issue Pudhari
ठाणे

kalyan skywalk encroachment: कल्याणच्या ‌‘स्कायवॉक‌’वर फेरीवाल्यांचे बस्तान

अनधिकृत फेरीवाल्यांसह गर्दुल्ले, भिकाऱ्यांचा वाढला वावर; प्रवाशांमध्ये संताप

पुढारी वृत्तसेवा

सापाड: कल्याणच्या विविध भागातून येणाऱ्या नागरिकांना रेल्वे स्थानक परिसरात स्कायवॉकची उभारणी करण्यात आली आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून हे स्कायवॉक पादचाऱ्यांसाठी बांधलेत की फेरीवाल्यांसाठी असा प्रश्न पडू लागला आहे.

या स्कॉयवॉकवर फेरीवाले, वारांगना, तृतीयपंथी, गर्दुल्ले आणि भिकाऱ्यांचा अहोरात्र वावर असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना स्काय वॉकवरून चालणे देखिल असह्य झाले आहे. त्यामुळे स्कायवॉक नागरिकांच्या सोईसाठी मोकळे करून देण्याची मागणी सध्या जोर धरू लागली आहे. परिणामी स्काय वॉक हे पादचाऱ्यांसाठी बांधलेत की फेरीवाल्यांसाठी असा प्रश्न पडू लागला आहे.

कल्याणच्या विविध भागातून येणाऱ्या नागरिकांना रेल्वे स्थानक परिसरात स्कायवॉकची उभारणी करण्यात आली आहे. लोकल गाडीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना स्काय वॉक चालण्यासाठी सोईस्करपणे असल्यामुळे बहुतेक प्रवाशी वाहनांच्या गर्दीतून प्रवास करण्यापेक्षा स्काय वॉकचा वापर मोठ्या प्रमाणात करतांना दिसत आहेत.

मात्र गेल्या काही महिन्यांपासून हे स्कायवॉक पादचाऱ्यांसाठी बांधलेत की फेरीवाल्यांसाठी असा प्रश्न पडू लागला आहे. या स्कॉयवॉकवर फेरीवाले आणि भिकाऱ्यांचे बस्तान अहोरात्र मांडून बसत असल्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना स्काय वॉक वरून चालणे देखील जिकरीचे झाले आहे. गर्दुल्ले आणि लुटारू यांच्यामुळे स्कायवॉकवरून प्रवास करणाऱ्या नागरिकांची सुरक्षा धोक्यात आली आहे.

फेरीवाल्यांच्या कचऱ्यामुळे या ठिकाणी आगी लागण्याच्या घटनाही वारंवार घडल्या आहेत. फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाबरोबरच भिकारी, गर्दुल्ल्यांचा उपद्रव कायम राहिल्याने पहाटे अथवा रात्री उशिरा या स्कायवॉकवरून प्रवासी अथवा नागरिकाला जीव मुठीत धरूनच मार्गस्थ व्हावे लागते.

फेरीवाले, वारांगना, भिकारी आणि गर्दुल्ले यांचा वावर मोठ्या प्रमाणावर असल्याने एक प्रकारे बकाल स्वरूप या स्कायवॉकला आले आहे. एकीकडे स्टेशन परिसरात सुरू असलेल्या स्मार्ट सिटीच्या कामांमुळे होत असलेली वाहतूककोंडी न सुटणारी आहे. तर दुसरीकडे स्काय वॉकवर बस्तान मांडून बसलेले अनधिकृत फेरीवाले, वारांगना, भिकारी, गर्दुल्ले आणि तृतीयपंथींमुळे सर्वसामान्य कल्यांणकरांना स्काय वॉक वरून चालणे देखील असह्य झाले आहे.

पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी महापालिकेने स्काय वॉकवर सुरक्षा रक्षक नेमले पाहिजेत. स्कायवॉकवर कोणत्याही प्रकारची अनधिकृत दुकाने नसावीत. स्कयवॉक वर साचलेले कचऱ्याचे ढिगारे, लाल पिचकाऱ्यांनी माखलेल्या स्कायवॉकच्या ग्रील ह्या तत्काळ स्वच्छ करून टाकावेत. स्टेशन परिसरातील वाहनतळ व रिक्षा स्टॅण्डजवळ भिकाऱ्यांचा आणि देह विक्री करणाऱ्या महिलांचा अड्डा बनत चालला आहे. पोलिसांचा याकडे दुर्लक्ष होत असल्याचे राजश्री जाधव यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT