Kalyan News | कल्याणच्या तिसगाव परिसरात स्मशानालगतच्या नाल्यात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह!  File Photo
ठाणे

Kalyan News | कल्याणच्या तिसगाव परिसरात स्मशानालगतच्या नाल्यात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह!

रहिवाशांत भितीचे वातावरण

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : कल्याण पूर्वेकडे असलेल्या तिसगाव परिसरात मंगळवारी धक्कादायक घटना समोर आली असून स्मशानालगत असलेल्या एका नाल्यात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली असून स्थानिक रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

    सकाळच्या सुमारास नाल्यात मृतदेह पडलेला असलेल्याचे दिसल्यानंतर तेथील रहिवाशांनी तातडीने याची माहिती कोळसेवाडी पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर हा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी केडीएमसीच्या रूक्मिणीबाई रूग्णालयात पाठवून दिला. सदर व्यक्तीच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

हा घातपात आहे की अपघाती मृत्यू ? याबाबत पोलिसांकडून सखोल तपास सुरू करण्यात आला आहे. मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम पोलिसांकडून युद्धपातळीवर सुरू असून परिसरातील बेपत्ता व्यक्तींची माहितीही तपासली जात आहे. या दुर्दैवी घटनेमुळे तिसगाव परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण असून पोलिस लवकरात लवकर या प्रकरणाचा छडा लावतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT