आईस्क्रिममध्ये आढळलेला कीडा  
ठाणे

kalyan News : कोळसेवाडीत आईस्क्रीमच्या कोनातून बाहेर पडला तीन इंची किडा, मुलांच्या आरोग्याशी खेळ

रचना पार्कमध्ये पालकांच्या सतर्कतेमुळे आला प्रकार उघडकीस : दुकानदारासह, वितरकाला जाब विचारल्यावर दोघांनीही केले हात वर

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : कल्याण पूर्वेकडील कोळसेवाडीच्या रचना पार्कमध्ये मातीमोल झाला. एका चिमुकल्याच्या हातात आलेल्या कोन आईस्क्रीममधून तब्बल तीन इंच लांब, किळसवाणा किडा बाहेर पडला. २०२७ पर्यंत मुदत असलेल्या नामांकित कंपनीच्या आईस्क्रीममध्ये हा कीडा पोहोचलाच कसा ? हा प्रश्न आता फक्त उपस्थित होत आहे.

वितरक दुकानदार दोघांनीही हात झटकले

रचना पार्कमधील एका दुकानातून एका मुलाने आईसक्रीम विकत घेतले. पहिला घास तोंडात घातला आणि त्याच क्षणी कोनात काहीतरी हालचाल जाणवली. बाहेर काढून पाहतो तर काय – तीन इंच लांब, जाडजूड, काळाकुट्ट किडा आइस्क्रीमला चिकटून होता. याचा जाब विचारल्यावर मी काय करू साहेब...माल सीलबंद आल्याची रड दुकानदाराने गायली. घाबरून त्याने कंपनीच्या वितरकाला बोलावले. पण तो महाशय आला, परिस्थिती पाहिली आणि आमचा संबंध नाही, असे तोंडघशी पाडून तिथून पळ काढता झाला.   हा निष्काळजीपणा नाही, हा सरळ सरळ गुन्हा आहे. थेट ३०८, २७३ कलमांखाली गुन्हा दाखल करा. कंपनीचा परवाना रद्द करा. अशी पालकांनी मागणी आहे.

हा किडा लहान मुलाच्या पोटात गेला असता तर, संबधित मुलाच्या जीवाला धोका निर्माण झाला असता. यामुळे या प्रकाराबाबत पालकवर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT