Environmental Awareness Kalyan
कल्याण : प्रत्येक दिवस हा स्वयंप्रशिक्षणाचा आणि अनुभवाचा असतो, ही संकल्पना शाळांमध्ये रुजवणे अत्यंत गरजेचे आहे, असे महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी सांगितले. डोंबिवलीतील बालभवन येथे कल्याण-डोंबिवली महापालिका आणि पर्यावरण दक्षता मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित निसर्गोत्सवात ते बोलत होते.
कार्यक्रमात पर्यावरण विषयक कलात्मक प्रदर्शन, झाडांचे महत्त्व, छायाचित्रे, आणि पर्यावरणपूरक उपक्रम यांचे कौतुक करत आयुक्तांनी मंडळाच्या कार्याला ब्रँड अँबेसिडर म्हणत गौरविले. त्यांनी डोंबिवलीतील ठिकाणी वृक्षारोपण व हिरवाई वाढवण्याचे आवाहन केले. पाण्याची बचत, वस्तूंचा पुनर्वापर, आणि प्लास्टिकचा टाळावा -अशा छोट्या उपक्रमांनी पर्यावरणप्रेम वाढवण्याचा संदेशही त्यांनी दिला.