Kalyan Municipal Engineer took a bribe of Rs. 40,000
ठाणे : पुढारी वृत्तसेवा
कल्याणमध्ये नवीन पेट्रोल पंप टाकण्यासाठी ड्रेनेज ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना आज ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने कल्याण डोंबिवली महापालिकेचे सहायक अभियंता रवींद्र अहिरे यांना रंगेहाथ पकडले. ही लाच बिर्ला महाविद्यालयाच्या समोरील रस्त्यावरील खासगी वाहनात घेण्यात आली. यामुळे पालिकेत एकच खळबळ उडाली.
कल्याणमध्ये श्री समर्थ पेट्रोलिक पेट्रोल पंप उघडण्यात येत आहे. त्याकरिता ड्रेनेज ना हरकत प्रमाणपत्र घेण्यासाठी पालिकेच्या ड्रेनेज विभागात अर्ज करण्यात आले. त्यावेळी सहाय्यक अभियंता रवींद्र भिवसेन अहिरे यांनी ६० हजारांची मागणी केली. अखेर तडजोडीने ४० हजार रुपयांची लाच घेण्याचे निश्चित झाले आणि आज सापळा रचून रंगेहाथ पकडण्यात आले.