ठाणे

Lok sabha Election 2024 Results : कल्याणची सुभेदारी तिसऱ्यांदा डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे

निलेश पोतदार

कल्याण : पुढारी वृत्तसेवा कल्याण लोकसभा मतदार संघाच्या अटीतटीच्या निवडणुकीच्या मतमोजणीला आज (मंगळवार) सकाळपासून सुरुवात झाली होती. शिवसेना महायुतीचे उमेदवार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी प्रतिस्पर्धी शिवसेना उध्दव ठाकरे गट महाविकास आघाडीच्या वैशाली दरेकर यांच्याशी लढतीत पहिल्या फेरी पासुनच दहा हजारांहून अधिक मताची आघाडी मिळवीत आपली विजयी घोडदौड सुरू ठेवली. सोळाव्या फेरीतील डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ऊबाठाच्या वैशाली दरेकर यांच्यावर दोन लाखांची आघाडी घेत आपल्‍या विजयावर शिक्कामोर्तब केला.

यामुळे शिवसेना महायुतीचे कार्यकर्ते व शिवसैनिकांनी मतमोजणी केंद्राबाहेर गुलाल उधळत विजयाचा जल्लोष साजरा केला. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मतमोजणी केंद्रात येऊन मतमोजणीसाठी नेमलेल्या आपल्या पदाधिकाऱ्यांशी भेट घेत विजयाचा आनंदोत्सव साजरा केला. मीडिया सेंटर मध्ये येऊन पत्रकारांचीही त्‍यांनी भेट घेतली.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT