ईव्ही बसेस दोन महिन्यांपासून बस डेपोत धूळ खाताहेत!  
ठाणे

Kalyan E-Bus : ईव्ही बसेस दोन महिन्यांपासून बस डेपोत धूळ खात: कल्याणकर प्रवासी मात्र हैराण!

गोदरेज पार्क आणि झुलेलाल परिसरासाठी दोन-दोन बसेस सुरू करण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : कल्याण पश्चिमेतील मीनाताई ठाकरे बस डेपोमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून उभ्या असलेल्या ईव्ही बसेस अजूनही प्रवासी सेवेत दाखल झालेल्या नाहीत. दुसरीकडे गोदरेज पार्क मार्गावर एका तासाच्या अंतराने बस मिळत असल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. झुलेलाल परिसरातही नियमित बससेवेचा अभाव आहे. या समस्यांबाबत ज्येष्ठ नागरिक प्रदीप कुमार त्रिवेदी यांनी केडीएमसी प्रशासन आणि महापौरांना निवेदन देऊन तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.

   प्रदीप कुमार त्रिवेदी यांनी डेपोमध्ये उभ्या असलेल्या ईव्ही बसेस तातडीने प्रवासी सेवेत सुरू करण्याची मागणी केली आहे. त्यांनी सांगितले की, याबाबत यापूर्वीही अनेक वेळा अर्ज दिले आहेत, मात्र अजूनही बसेस सुरू करण्यात आलेल्या नाहीत. गोदरेज पार्क मार्गावर सध्या केवळ एकच बस धावत असल्याने प्रवाशांना पुढील बससाठी जवळपास एक तास वाट पहावी लागत आहे.

झुलेलाल परिसरातही बसेसची संख्या पुरेशी नाही. एवढेच नाही, तर अनेक ठिकाणी बस थांब्यावर माहिती फलक नसल्याने प्रवाशांना बस कुठे थांबते हेच कळत नाही. गोदरेज पार्क मार्गाचा स्वतंत्र फलकही लावण्यात आलेला नाही. गोदरेज पार्क आणि झुलेलाल परिसरासाठी दोन-दोन बसेस सुरू कराव्यात, बस डेपोत उभ्या असलेल्या ईव्ही बसेस तातडीने सेवेत आणाव्यात. तसेच सर्व बस थांब्यांवर दिशादर्शक फलक लावावेत, अशीही त्यांनी मागणी केली आहे. प्रशासनाला प्रवाशांचा त्रास गांभीर्याने घेऊन बससेवा नियमित आणि पुरेशा संख्येत उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT