राष्ट्रध्वज फडकावून आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांनी ध्वजाला मानवंदना दिली. pudhari photo
ठाणे

कल्याण-डोंबिवलीत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

Republic Day: आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांनी ध्वजाला मानवंदना दिली

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : 76 व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या मुख्यालयात सकाळी साडेसात वाजता राष्ट्रध्वज फडकावून आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांनी ध्वजाला मानवंदना दिली. यावेळी अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, शहर अभियंता अनिता परदेशी यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी अग्निशमन दल, सुरक्षा दल, स्थानिक पोलिस आणि एमएसएफच्या जवानांनी संचलन करून राष्ट्रध्वजाला सलामी दिली.

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या 44 गुणवंत सफाई कर्मचाऱ्यांचा आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांच्यासह उपस्थित अधिकाऱ्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक आणि भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. महापालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयाच्या प्रांगणातही ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अतिरीक्त आयुक्त योगेश गोडसे यांनी ध्वजवंदन करून तिरंग्याला मानवंदना दिली. या प्रसंगी परिमंडळ 2 चे उपायुक्त अवधुत तावडे, माजी पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांनी घर्डा सर्कलजवळ असलेल्या शहीद कॅप्टन विनयकुमार सचान यांच्या स्मारकास पुष्पचक्र वाहून अभिवादन केले. यावेळी कॅप्टन विनयकुमार सचान यांच्या कुटुंबीयांसह केडीएमसीचे अधिकारी कर्मचारी, तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डोंबिवली पूर्वेतील दत्तनगर चौकात दीडशे फुटी उंच ध्वज फडकवून महापालिका आयुक्‍त डॉ. इंदूराणी जाखड यांनी ध्वजवंदन केले. भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर संविधान ही संकल्पना सर्व मिळून राबवू आणि संविधानाचे पालन करून देशाला पुढे नेऊ, असे आवाहन करत आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त उपस्थित मान्यवरांसह नागरिकांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी एसआरपीएफचे कमांडंट गोकुलजी आणि परिमंडळ 3 चे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांचीही समयोचित भाषणे झाली. या प्रसंगी आमदार राजेश मोरे यांच्यासह माजी पदाधिकारी, महानगरपालिकेचे अधिकारी, वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि डोंबिवलीकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT