सापाड : योगेश गोडे
कल्याण डोंबिवलीमध्ये बेकायदा बांधकामाचा मुद्दा पुन्हा एकदा चिघळला असून, 65 बेकायदा इमारतींची तोडफोड निश्चित असल्याची माहिती याचिकाकर्ते संदीप पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवलीतील बेकायदा बांधकाम प्रकरण पुन्हा एकदा पेटण्याची चिन्हं दिसत आहेत.
65 बेकायदा इमारतींवर कारवाई न केल्याने याचिकाकर्ते संदीप पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत पुढच्या आठवड्यात न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बेकायदा इमारतींवरून पुन्हा एकदा मोठा वाद पेटण्याची चिन्हे आहेत.
केडीएमसी आणि पोलीस प्रशासनाकडे याबाबत स्पष्ट आदेश असूनही अद्याप कारवाई न झाल्यामुळे न्यायालयाच्या आदेशाचा अवमान झाल्याची तक्रार येत्या आठवड्यात दाखल केली जाणार असल्याचे याचिकाकर्ते संदीप पाटील यांनी गुरुवारी स्पष्ट शब्दांत प्रसारमाध्यमांसमोर सांगितले. कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन होत असून 65 बेकायदा इमारती निश्चितपणे पाडल्या जाणार आहेत.
65 बेकायदा इमारतींवर न्यायालयाने कारवाईचे आदेश दिले होते. मात्र इमारती पाडण्यासाठी पोलीस बल मिळत नसल्याचे कारण देत संबंधित प्रशासन टाळाटाळ करत असून त्यांना देखील नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती याचिकाकर्ते संदीप पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.
न्यायालयाने स्पष्ट आदेश दिल्यानंतरही 65 बेकायदा इमारतींच्या तोडक कारवाईला प्रशासन टाळाटाळ करत आहे. पुढच्या आठवड्यात मी स्वतः कोर्टात अवमान याचिका दाखल करणार आहे. या इमारती तुटणार म्हणजे तुटणारच! राजकीय नेते केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या इमारती वाचवत आहेत. ही आश्वासने म्हणजे निव्वळ ‘लॉलीपॉप’ आहेत. निवडणुका झाल्यावर या इमारती पाडल्याच जातील.संदीप पाटील, याचिकाकर्ते