हल्लेखोरांनी केलेल्या दगडफेकीत कारचे झालेले नुकसान  Pudhari Photo
ठाणे

Kalyan Crime | कल्याणच्या बेतुरकरपाड्यावर रक्तरंजित थरार : शिंदे शिवसेनेच्या माजी नगरसेवकासह दोघा शिवसैनिकांवर हल्ला

पुर्ववैमनस्यातून झालेल्या दगडफेकीमध्ये कारचा खुर्दाः तर दोघांची प्रकृती चिंताजनक

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : कल्याण पश्चिमेकडे असलेल्या बेतुरकरपाडा भागात शिंदे शिवसेनेचे माजी नगरसेवक उमेश बोरगावकर यांच्या कार्यालयाबाहेर शुक्रवारी रात्री १५ जणांमध्ये पूर्ववैमनस्यातून हाणामारी झाली. हाणामारी सुरू असल्याने माजी नगरसेवक बोरगावकर आणि त्यांचे समर्थक ओंकार सपाट आणि ज्ञानेश्वर सपाट असे तिघेजण वाद सोडविण्यासाठी मधे पडले. दोन्ही गटांना बाजूला केल्यानंतर या हाणामारीतील जखमींना रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयातून बाहेर पडल्यावर दबा धरून बसलेल्या एका टोळक्याने शिंदे शिवसेनेचे माजी नगरसेवक उमेश बोरगावकर यांच्या कारला घेरून तुफान दगडफेक करून नुकसान केले.

टोळक्याने केलेल्या दगडफेकीच्या हल्ल्यात एम एच ०५/ इ एक्स /७११७ क्रमांकाच्या कारचा काचा फुटल्या. काही दगड कारमध्ये बसलेल्या माजी नगरसेवक उमेश बोरगावकर यांच्यासह सपाट बंधूंना लागले. एकावेळी पंधरा हल्लेखोरांनी बोरगावकर यांच्या कारला घेरले. सपाट बंधूंना दगडीचे घाव वर्मी बसल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

महात्मा फुले चौक पोलिसांना माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तणावपूर्ण परिस्थितीतवर नियंत्रण मिळविले. उमेश बोरगावकर यांनी स्वत:सह आपल्या समर्थकांवर १५ जणांच्या टोळक्याने एकावेळी हल्ला केल्याची तक्रार महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात केली आहे. शिंदे शिवसेनेच्या माजी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांवर हल्ला झाल्याने कल्याणमधील शिंदे शिवसेनेचे कार्यकर्ते बेतुरकरपाडा येथील माजी नगरसेवक उमेश बोरगावकर यांच्या कार्यालयात पोहोचले. तोपर्यंत हल्लेखोर पसार झाले होते.

या संदर्भात उमेश बोरगावकर यांनी सांगितले की, दोन्ही गटात यापूर्वी दसरा सणाच्या काळात वाद झाला होते. त्यांच्यात पूर्वीपासून काही वाद आहे. भांडण करणारा गट हा मुरबाड तालुक्यातील आहे. आपल्या कार्यालयासमोर दोन गटात वाद सुरू होता. म्हणून आपण तो वाद सोडविण्यासाठी समर्थकांसर पुढे आलो. दोन्ही गटांना बाजुला केले. जखमींना आपल्या कारमध्ये टाकून घेऊन त्यांनी पहिले. जखमींवर रुग्णालयात उपचारासाठी नेले होते. समाजसेवा म्हणून पुढे आलो तर हल्लेखोरांनी आपणास नाहक लक्ष्य केले, असे उमेश बोरगावकर यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT