कसारा : शाम धुमाळ
शहापूर तालुक्यात शुक्रवार (दि.4) रोजी पुन्हा वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे मुंबई नाशिक महामार्गावरील खर्डी आठगाव दरम्यान दोन्ही लेन वर महावितरणच्या वायर रस्त्यावर पडल्यामुळे काही काळ महामार्गवरील दोन्ही बाजूची वाहतूक 30 मिनिट ठप्प झाली होती.
महावितरणच्या वायर रस्त्यावर पडल्याने घटनास्थळी शहापूर महामार्ग पोलीस खर्डी पोलीस व आपत्ती व्यवस्थापन टीम च्या सदस्यांनी धाव घेत वीज वितरण कंपनी शी संपर्क करून लाईट बंद करण्यात आली. त्यानंतर रस्त्यावर पडलेल्या वायरी महामार्ग पोलिसांनी रस्त्याहून बाजूला केल्या व महामार्गवरील वाहतूक सुरळीत केली. महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सदर वायरी पुन्हा जोडणीचे काम सुरु केले आहे. दरम्यान अवकाळी पावसाचा फटका रेल्वे सेवेला देखील बसला आहे.
कसारा मुंबई ट्रेन तानशेत स्टेशन जवळ उभी असताना रेल्वे बाजूला रेल्वे स्टेशनच्या कामगारांसाठी बांधण्यात आलेल्या शेडचे पत्रे हे उडून उभ्या असलेल्या ट्रेन वर पडल्याने काही काळ ही ट्रेन एकाच ठिकाणी उभी करण्यात आली. शहापूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडत असून काही ठिकाणी गारपीट झाली आहे. यातच कसारा ट्रेन ही तानशेत स्टेशन वर आली असता वादळी वाऱ्यासह पाऊस पडत असल्याने बाजूला रेल्वे कामगारांसाठी बांधण्यात आलेल्या शेड चे पत्रे वादळाने उडून उभ्या असलेल्या ट्रेन वर पडल्याने ट्रेन काही काळ एकाच ठिकाणी उभी होती. ट्रेन वरील व रेल्वे लाईन वरील पत्रे बाजूला केले आहेत
शहापूर तालुक्यात जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली असून वादळी वाऱ्यासह गारपीट होत आहेत. सध्या उकाड्याने हैराण झाले असून उन्हाचा तडाखा वाढला आहे. यातच दुपार नंतर अवकाळी पावसाने हजेरी लावली असून वादळी वाऱ्यासह पाऊस पडत असून तालुक्यातील काही भागात गारपीट देखील झाली आहे. गारपीट झालेल्या भागात लहान मुले थंडगार गारा वेचण्यात मग्न झाल्याचे दिसून येत आहे.