ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) राष्ट्रीय सरचिटणीस आमदार जितेंद्र आव्हाड यांचे स्वीय सहाय्यक अभिजित पवार आणि कट्टर कार्यकर्ते हेमंत वाणी यांनी आव्हाड यांची साथ सोडून आज (दि.१८) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यामुळे आव्हाड यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. (Maharashtra Politics)
आमदार जितेंद्र आव्हाड यांचे निकटवर्तीय अभिजित पवार आणि हेमंत वाणी यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते. त्यानंतर त्यांना तडीपार व्हावे लागले होते. आव्हाड यांच्यासाठी आपल्या अंगावर गुन्हे दाखल करून घेणारे हे दोन्ही कट्टर कार्यकर्ते अजित पवार गटात गेल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. (Maharashtra Politics)
याबाबत अभिजित पवार यांना विचारणा केली असता, माझ्या प्रभागातील विकास कामांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. मात्र आव्हाड यांच्यावर टीका करण्यास त्यांनी टाळलं. तसेच प्रभागातील लोकांच्या कामासाठी पक्ष सोडल्याचे हेमंत वाणी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.