भिवंडी पालिका स्थायी समिती सभापतीपदी इशा खान विजयी pudhari photo
ठाणे

Bhiwandi Politics : भिवंडी पालिका स्थायी समिती सभापतीपदी इशा खान विजयी

शिवसेना शिंदे गटाचा पराभव; ऐनवेळी भाजपा सदस्य गैरहजर

पुढारी वृत्तसेवा

भिवंडी : भिवंडी महानगर पालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) पक्षाच्या इशा इमरान खान या विजयी झाल्या आहेत. इशा खान यांनी शिवसेना शिंदे गटाच्या अस्मिता प्रभुदास नाईक यांचा चार मतांनी पराभव केला आहे. पीठासन अधिकारी म्हणून ठाणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रणजीत यादव यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या या सभेत स्थायी समिती सभापती पदासाठी ईशा इम्रान खान राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.), गीता विठोबा नाईक भाजपा, अस्मिता प्रभुदास नाईक शिवसेना शिंदे गट यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

अर्ज माघारी घेण्याच्या 15 मिनिटांच्या मुदतीत भाजपाच्या गीता नाईक यांनी गटनेते संतोष शेट्टी यांच्या सोबत सभागृहात दाखल होत पीठासन अधिकारी यांच्याकडे अर्ज माघारी घेत असल्याचे पत्र दिले. त्यानंतर झालेल्या मतदानात राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) पक्षाच्या इशा इमरान खान यांना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) व भिवंडी विकास आघाडीचे जावेद दळवी या आठ सदस्यांनी मतदान केले. तर अस्मिता प्रभुदास नाईक यांच्या बाजूने शिवसेना शिंदे गट, समाजवादी पार्टी व कोणार्क विकास आघाडीचे ॲड.मयुरेश पाटील अशा चार सदस्यांनी मतदान केले.

उमेदवारी अर्ज माघार घेऊन भाजपच्या गीता नाईक या गटनेते संतोष शेट्टी यांच्या सोबत सभागृहा बाहेर निघून गेले. तर भाजपा सदस्य सुमित पाटील व सुहास नकाते हे सभागृहात आले नाहीत. त्यांच्या गैरहजेरी मुळे सेक्युलर फ्रंटच्या इशा खान यांचा विजय सुकर झाला.

विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार : इशा खान

सेक्युलर फ्रंटचा स्थायी समिती मधील विजय हा खासदार सुरेश म्हात्रे, आमदार रईस शेख व राष्ट्रवादी काँग्रेस (श. प.) पक्षाचे शहराध्यक्ष शोएब खान गुड्डू व महापौर नारायण चौधरी माजी उपमहापौर इम्रान खान यांच्या राजकीय रणनीतीचा विजय आहे. असे सांगत माझ्या सारख्या नवख्या सदस्यावर विश्वास दाखवला आहे.अशी प्रतिक्रिया ईशा इम्रान खान यांनी दिली आहे. शहर विकासासाठी कामावर भर असून स्थायी समिती माध्यमातून विकास कामे जलद गतीने मार्गी लागतील असा विश्वास स्थायी समिती सभापती इशा इमरान खान यांनी व्यक्त केला आहे.

स्थायी समितीमध्ये भाजपाचे चार सदस्य आहेत. आम्हाला कोणीही मतदान करण्यासाठी विचारले नव्हते. त्यामुळे आम्ही सेक्युलर फ्रंट अथवा शिवसेना शिंदे गट यांना मतदान न करण्याचा निर्णय घेत सभागृहात निवडणूक प्रसंगी गैरहजर राहिलो.
संतोष शेट्टी, भाजपा गटनेता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT