जगातील सर्वात उंच स्वतंत्र पर्वत व सात शिखरांपैकी एक उंच पर्वत आफ्रिका खंडातील व पूर्व आफ्रिकेतील टांझानिया देशातील माउंट किलिमांजारो हा सर्वात उंच असलेला पर्वत डोंबिवलीतील तेवीस वर्षीय गिर्यारोहक आर्यन शिरवाळकर या तरुणाने अवघ्या तेरा दिवसाच्या मोहीम अंतर्गत सर केला.
या पर्वताची उंची 19 हजार 341 फूट (5 हजार 895 मीटर) असून हा जगातील सर्वात उंच स्वतंत्र पर्वत आहे आणि सात शिखरांपैकी एक असलेल्या माऊंट किलिमांजारो पर्वत अवघ्या तेरा दिवसाच्या मोहीम अंतर्गत सर केला व भारताचा तिरंगा जगातील सर्वांत उंच शिखरवार रोवला आहे. गिर्यारोहक अजित डोंबिवलीतील आपल्या घरी परतताच त्याच्या इमारतीतील रहिवाश्यांना मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात त्याचे ढोल ताश्याच्या गजरात आंनदोत्स्व साजरा केला.माऊंट किलिमांजारो पर्वत सर करणारा ठाणे जिल्ह्यातील पहिला गिर्यारोहक ठरल्याने त्याच्या वर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.
डोंबिवली पूर्वे कडील एमआयडीसी निवासी विभागातील पाम व्ह्यू. सोसायटीत राहणारा आर्यन अजित शिरवळकर या तेवीस वर्षीय तरुणाला लहानपणा पासूनच निसर्गाची आवड असल्याने खडक,डोंगर, गड,किल्ले पर्वतावर चढण्याची त्याला आवड निर्माण झाल्याने आर्यनचे वयाच्या पंधराव्या वर्षा पासून आपली ही आवड जोपासायला लागला. गिर्यारोहनाचे प्रशिक्षण येथून घेतले. त्या नंतर आर्यनने वयाच्या सोळाव्या वर्षी पहिल्यांदा पथल शु माऊंटन सर केला. 13 हजार 500 फूट उंच सर केला. भारतातील हिमाचल, उत्तराखंड व अन्य राज्यातील 50 हून अधिक पर्वत गड किल्ले तसेच महाराष्ट्रातील 500 हून अधिक गड किल्ले,पर्वत सर केले आहेत.
जगातील सर्वात उंच माउंट किलिमांजारो पर्वत समुद्रसपाटी पासून 19,341 फूट उंच असून हा माऊंटन सर करण्यासाठी 6 जुलै ते 12 जुलै या सात दिवसाच्या कालावधीची मोहीम होती. 12 जुलैला माउंट किलिमांजारो पर्वत सर करीत महिम फत्ते केली व उच्च शिखरावर पोहोचून भारताचा तिरंगा फडकवल्याचे आर्यन याने सांगितले. सात दिवस चाललेल्या या मोहिमेमध्ये कमी वायुदाब, कमी ऑक्सिजन, लांबवर पसरलेले रस्ते आणि उपलब्ध पाणी अशा अनेक कठीण परिस्थितीला पार करत समोर जावे लागले असल्याचे त्याने सांगितले.
आर्यन, गेल्या 7 वर्षांहून अधिक काळ आउटडोअर क्षेत्रात कार्यरत असून, त्याने भारतातील विविध निसर्गरम्य भागांमध्ये 400 हून अधिक ट्रेक्स आणि अॅडव्हेंचर अनुभवांचे नेतृत्व केले आहे. ज्यामध्ये डे ट्रेक्स, मल्टी-डे बॅकपॅकिंग ट्रिप्स आणि हिमालयातील ट्रेक्स यांचा समावेश आहे.