कोपरी रेल्वे पुल:मुंबई 
ठाणे

कोपरी रेल्वे पुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन, मुंबई-ठाण्यातील प्रवाशांची वाहतूक कोंडीपासून सुटका

मोनिका क्षीरसागर

मुंबई; पुढारी वृत्तसेवा: मुंबई-ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर प्रवाशांची वाहतूक कोंडीपासून सुटकेच्या दृष्टीने ठाणे शहरातील कोपरी येथील रस्ताचे रुंदीकरण करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज ( दि. ९) या रेल्वे पुलाचे उद्घाटन करण्यात आले. या पुलामुळे मुंबई-ठाण्यातील प्रवाशांच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार असल्याने येथील नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

पहिला हा रोड २+२ पथ मर्गिकेचा होता, आत्ता या ओलंडणी पुलाचे ४+४ मार्गिका असे रुंदीकरण करण्यात आले आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत हे रूंदीकरण करण्यात आले होते. कोपरी रेल्वे ओलांडणी पुलाच्या कामाचा संपूर्ण खर्च 'एमएमआरडीए'मार्फत करण्यात आला आहे. पुलाच्या रेल्वे मार्गिकांवरील भागाचे काम मध्य रेल्वे मार्फत करण्यात आले असून, या भागाच्या बांधकामाकरीता प्राधिकरणकडून रेल्वेला निधी देण्यात आला आहे. या पुलाची लांबी ७८४ मीटर तर रुंदी ३७.०४ मीटर इतकी आहे.

पूर्व द्रुतगती महामार्गावर हा ५+५ मार्गिकांचा आहे, तर ठाणे शहारातील कोपरी रेल्वे ओलांडणी पुल हा २+२ मार्गिकांचा होता. या अरुंद रेल्वे ओलांडणी पुलामुळे सकाळ व संध्याकाळच्या कालावधीत या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत होती. वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्याच्या उद्देशाने प्राधिकरणामार्फत कोपरी रेल्वे ओलांडणी पुलाचे रुंदीकरण व बांधकाम करण्यात आले आहे. २+२पथ मर्गिकेच्या पुलाचे ४+४ असे अपग्रेड केल्यामुळे मुंबई-ठाणे जिल्ह्याच्या सीमेवरील वाहतूक कोंडी कमी होऊन फायदा पूर्व द्रुतगती महामार्गावरील लहान तसेच अवजड वाहनांना होणार आहे. या प्रकल्पात नौपाडा जंक्शन ते ज्ञानसाधना कॉलेजपर्यंत महामार्गाखालून वाहानांच्या रहदारीकरीता २+२ मार्गिकांचा ४० मीटर लांब आणि २१.२ मीटर रुंद भुयारी मार्ग देखील बांधण्यात आला आहे.

प्रस्तावित नवीन कोपरी स्टेशनला जोडणारा वाहनांसाठी भूयारीमार्ग, पादचाऱ्यांना पूर्व द्रुतगती महामार्ग ओलांडण्यासाठी पादचारी पूल देखील बांधण्यात आला आहे. तसेच चिखलवाडी परिसरातील पावसाळी पाण्याचा निचरा होण्याकरीता, चिखलवाडी नाल्यापासून साठेवाडी नाल्यापर्यंत पर्जन्य जल वहिनीची (स्ट्रॉम वॉटर ड्रेनची) सुविधा उपलब्ध करून देणारा बंधिस्त नाल्याचे सुधारीकारण देखील करण्यात आले आहे.

"कोपरी पूल हा मुंबई आणि ठाणे या दोन्ही जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. जुना पूल हा अरुंद असल्यामुळे व्यस्त तासांत (पीक अवर्स) मध्ये वाहनचालकांना काही मीटरचा प्रवास करण्यासाठी ३०ते ४० मिनिटे लागतात. पूर्व द्रुतगती महामार्गावरील दोन्ही बाजूने येणाऱ्या वाहनांची मोठ्या प्रमाणात कोंडी होत होती. नवीन रुंद पुलामुळे प्रवाशांचा आता हा वेळ वाचणार आहे. त्यासोबतच तीन हात नाका परिसरातील वाहतुकीत मोठ्या प्रमाणात घट होणार आहे" असे एमएमआरडीएचे महानगर आयुक्त श्री एस.व्ही.आर. श्रीनिवास यांनी म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT